Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात आता महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप (Maharashtra Assembly Elections 2024) अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही आघाड्यांच्या नेत्यांकडून तसा दावा केला जात आहे. महायुतीच्या जागावाटपाची चर्चा वेगाने पुढे सरकत आहे. काल मध्यरात्री महाविकास आघाडीची बैठक सुरू होती. हॉटेल ट्रायडंटमधील या बैठकीत मविआच्या नेत्यांनी जवळपास सर्वच जागांवरील तिढा सोडवल्याचे सांगितले जात होते. परंतु, तसे नसल्याचे रविवारी दुपारी स्पष्ट झाले. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गट नाराज असल्याची बातमी बाहेर आली आहे. यानंतर ठाकरे गटाने तातडीने एक बैठक बोलावली आहे. ठाकरे गटाच्या या हालचालींमुळे मविआतील घटक पक्षांचं टेन्शन मात्र वाढलं आहे.
Video : लाडकी बहीण योजना बंद होणार का? अजित पवार म्हणाले, राखीची शपथ घेतो अन्
महाविकास आघाडीत मुंबई आणि विदर्भातील जवळपास २८ जागांवरून तिढा निर्माण झाला होता. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झाला होता. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका झाली होती. ठाकरे गटाने विदर्भातील काही जागा मागितल्या होत्या. परंतु, काँग्रेस जागा सोडण्याच्या मूडमध्ये नव्हती. काँग्रेसने तुटेपर्यंत ताणू नये असा इशाराही ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिला होता. त्यामुळे काही जागांवरून दोन्ही गटाच्या नेत्यांनी दबावाचं राजकारण सुरू केलं होतं.
या पार्श्वभुमीवर शनिवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरू झाली होती. रात्री १ वाजेपर्यंत ही बैठक चालली. या बैठकीत नेत्यांनी जवळपास सर्व जागांवरील तिढा सोडवल्याची सांगण्यात येत आहे. या बैठकीत जवळपास सर्वच जागांवर तिढा सोडवणण्यात आल्याचे सांगितले गेले होते. परंतु, ही माहिती खरी नव्हती हे दुपारपर्यंतच स्पष्ट झालं.
यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्री येथे तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. काँग्रेसबरोबर सुरू असलेल्या वादामुळेच ही स्वतंत्र बैठक बोलावण्यात आल्याचे आता सांगण्यात येत आहे. या बैठकीत राज्यातील सर्व 288 जागा लढवण्यासंदर्भात आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात आले. या माध्यमातून काँग्रेसवर दबाव आणण्यात येणार असल्याची रणनीती आहे.