Download App

खंडाळा घाटातील अपघात नेमका झाला कसा? वाचा बर्निंग टँकरचा थरार

Mumbai Pune Express Highway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात (Khandala Ghat)एका टँकरचा अपघात (Tanker accident)झाला आणि त्यानं अचानक पेट घेतला. या अपघातामध्ये आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वी पाऊस झाल्याने आग आटोक्यात आली होती मात्र या आगीचा पुन्हा भडका उडाला आहे. दोन तासांपासून आगीचे लोट (fire)सुरुच आहेत. दुर्घटनेनंतर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झालेली आहे. हे सर्व असतानाच अपघात नेमका घडला तरी कसा हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. त्याबद्दल आता माहिती समोर आली आहे. (mumbai-pune-express-highway-accident-read-the-thrill-of-burning-tanker)

मोठी बातमी : खंडाळा घाटात भीषण अग्नितांडव; चौघांचा होरपळून मृत्यू तर, तिघे जखमी

मिळालेली माहिती अशी की, खंडाळा घाटाजवळ तीव्र उतार आहे. त्यातच ऑईलचा टँकर भरधाव वेगाने जात होता. त्याचवेळी अचानक चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. त्यानंतर टँकरमधील ऑईल महामार्गावर असलेल्या होर्डिंगवर पडलं. टँकर कठड्याला जावून धडकला आणि पलटी झाला. त्यानंतर या टँकरमध्ये असलेल्या ऑईलने लगेच पेट घेतला. या टँकरमागे असलेल्या वाहनातील प्रवाशांनी हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला. हा थरार पाहून त्या प्रवाशी देखील प्रचंड घाबरले होते.

शिंदे आणि फडणवीस आज एकत्र कोल्हापूरला जाणार होते पण…?

ही दुर्घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली. दुर्घटनाग्रस्त टँकरमध्ये मिथाईल केमीकल होते. त्यामुळे टँकरने अचानक पेट घेतला. ब्रिजच्या खाली जवळच्या गावातील प्रवासी होते. ते आपल्या गावात कामासाठी निघालेले असावेत. अचानक लागलेल्या आगीचा गोळा त्यांच्या अंगावर पडला, त्याच्यातच दोन मुलं आणि एक महिला जखमी झाली आहे. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

ऑईल टँकरला भीषण आग लागल्याने ब्रिजच्या खाली देखील या आगीच्या झळा पोहोचल्या आहेत. त्यासोबतच ब्रिजच्या खालच्या दोन ते गाड्यांना देखील आग लागली. ऑईल टँकरला आग लागल्याने पुन्हा स्फोट झाला आहे.

आग अद्यापही धुमसत असल्यानं आणि भडकवल्याची भीती असल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक आणि पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tags

follow us