शिंदे आणि फडणवीस आज एकत्र कोल्हापूरला जाणार होते पण…?

शिंदे आणि फडणवीस आज एकत्र कोल्हापूरला जाणार होते पण…?

Devendra Fadnavis Kolhapur Visit Cancelled : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा कोल्हापूर (Kolhapur) दौरा रद्द करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या तब्येतीचं कारण देऊन हा दौरा रद्द केल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी माध्यमांना दिली आहे. राज्यातील वृत्तपत्रात शिवसेनेने दिलेल्या जाहिरातीमुळे शिवसेना-भाजप यांच्यात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे. देशात मोदी, राज्यात शिंदे या मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Best Bakery case : देशातील सर्वात निघृण हत्याकांड प्रकरणाचा निकाल; २ आरोपींची निर्दोष मुक्तता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.13) कोल्हापूर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती देण्यात आली होती. आता मात्र कानाला इजा झाल्याने विमान प्रवास टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे हा दौरा रद्द केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांना दिली आहे.

Cabinet Decision: ग्रामसेवकांच्या वेतनात १० हजाराची वाढ तर शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी

राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाकडून वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्यातील राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आलं आहे. या राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आत्तापर्यंत देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र अशी जाहिरात दिसून आली आहे. त्यात अचानक बदल झाल्याने राज्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

या जाहिरातमध्ये महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री हवे आहेत तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के लोकांची पसंती असल्याचे एका सर्व्हेमध्ये समोर आल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदेंपेक्षा तब्बल तीन टक्के मतं कमी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेने या जोडीला पसंती दर्शवल्याचे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे. यामध्ये फडणवीस आणि शिंदे यांची एकंदरीत तुलना करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube