Mumbai Pune Express Way Accident News : राज्यात रस्ते अपघातांची सातत्याने वाढत (Mumbai Pune Expressway Acident) चालली आहे. भरधाव वेगातील वाहने अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. आताही असाच एक भीषण अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर घडला आहे. खोपोलीजवळ झालेल्या या अघातातत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेलरने 15 ते 16 वाहनांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली.
ट्रेलरची धडक इतकी जोरात होती की तीन वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला तर अन्य वाहनांचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 15 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातानंतर येथे मौठी वाहतूक कोंडी झाली होती. पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अन्य यंत्रणा घटनास्थळी दाखळ झाल्या.
अहमदाबाद विमान अपघात अन् 4 दिवसांनी आजारी पडले 112 पायलट, संसदेत धक्कादायक खुलासा
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा अत्यंत रहदारीचा मार्ग आहे. दिवसभरात हजारो वाहने या मार्गावरुन ये जा करत असतात. त्यातच वीकेंड असल्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली होती. नेमक्या याच वेळी हा अपघात झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खोपोली परिसरात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार नव्याने तयार करण्यात आलेल्या बोगद्याजवळ जवळपास वीस वाहनांना एका ट्रेलरने जोराची धडक दिली.
लोणावळा खंडाळा घाटातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर उतरत्या वेळी ट्रेलरचे ब्रेक अचानक फेल झाले. त्यामुळे ट्रेलर अनियंत्रित झाला आणि पुढे चालणाऱ्या काही वाहनांना धडक दिली अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही प्राथमिक माहिती आहे. अपघाताची संपूर्ण चौकशी झाल्यानंतरच हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे घडला याची माहिती मिळेल.
अपघातानंतर या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खोपोली पोलीस आणि स्थानिक मदत पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. या द्रुतगती मार्गावर दररोज दोन लाखांपेक्षा जास्त वाहने ये जा करत असतात. शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडले होते. नेमक्या याच वेळी हा भीषण अपघात झाला.
अपघातानंतर स्विफ्ट चालकांकडून मर्सिडीज गाडीची तोडफोड, आठ वर्षाच्या मुलालाही नेलं उचलून