मिसिंक लिंकच्या उद्धाटनाच्या दिवशीच एक्सप्रेस वेवर प्रवाशांचे हाल; 5 ते 6 तासांपासून वाहनांच्या रांगा

Mumbai Pune Expressway वर लोणावळा घाटामध्ये तब्बल पाच ते सहा तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway

Mumbai Pune Expressway Traffic Jam on day of the inauguration of Missing Link Queues of vehicles for 5 to 6 hours : एकीकडे मुंबई पुण्याचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्यासाठी मिसिंक लिंक उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा घाटामध्ये तब्बल पाच ते सहा तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे. सलग सुट्ट्यांमुळे अनेक प्रवासी फिरण्यासाठी बाहेर पडले असताना आज सकाळपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्या या घाटात अडकलेल्या आहेत.

1 मेपासून राज्यात राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध

दरम्यान पाच ते सहा तास उलटून गेले तरी देखील ही वाहतूक कोंडी सुटत नसल्याने लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक कडक उन्हात असल्याने त्यांना त्रास होत आहे. प्रवाशांकडे पाणी देखील संपलं असल्याच्या व्यथा अनेकांनी मांडल्या आहेत. ही वाहतूक कोंडी खालापूर टोलनाक्यापासून सुरू झाली आहे. तसेच ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 25 मिनिटांचे ब्लॉग घेतले जात आहेत. या वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून अनेक प्रवाशांनी फूड मॉलला थांबणं पसंत केलं आहे. मात्र फूडमॉलची पार्किंग देखील भरून गेली आहे. तर इलेक्ट्रिकल वाहनांची मर्यादा कमी असल्याने ते बंद पडण्याची शक्यता आहे.

‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ते ‘मिर्जापूर: द मूवी’ आणि ‘पेड्डी’पर्यंत, 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपट

या घटनेमुळे प्रवासी सरकारवर चांगलेच संतापलेले आहेत. दुसरीकडे मिसिंक लिंकच आज दुपारी एक वाजता उद्घाटन आहे. मात्र मिसिंग लिंक प्रकल्प झाल्यानंतर देखील अशीच परिस्थिती होऊ नये. किमान मिसिंग लिंक तरी चांगल्या सुविधा आणि उपायोजना राबवाव्यात अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.

 

Exit mobile version