नगरपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर आज होणार फैसला, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Supreme Court On Nagar Panchayat Result : राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले असून 21 डिसेंबर

Supreme Court On Nagar Panchayat Result

Supreme Court On Nagar Panchayat Result

Supreme Court On Nagar Panchayat Result : राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले असून 21 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने आता 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठाने दिलेले आदेश रद्द करुन तत्काळ मतदान झालेल्या नगरपंचायत आणि नगरपिरषदांचे निकाल जाहीर करण्यात यावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या या याचिकेवर आज शुक्रवार (5 डिसेंबर) रोजी सुनावणी होणार आहे. आजच्या या सुनावणीत सर्वोच्च न्यायालया काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

नेमकं प्रकरण काय?

मतदानाच्या काही तासांपूर्वी ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये 50 टक्के आरक्षणापेक्षा जास्त आरक्षण आहे या नगरपंचायत आणि नगरपारिषदांसाठी मतदान प्रक्रिया रद्द करत 20 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यातील सर्व नगरपंचायत आणि नगरपरिषदांचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण, न्यायालयाचा मोठा निर्णय; शीतल तेजवानीला 8 दिवस पोलीस कोठडी

या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला तत्काळ रद्द करुन मतदान झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांचे निकाल जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Exit mobile version