Muralidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यासमोरच भाजपचे (BJP) कार्यकर्ते भिडले असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, पुण्यातील बालाजी नगर येथील शंकर महाराज मठात (Shankar Maharaj Mut) भाजप कार्यकर्ते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासमोरच भिडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नितीन कदम (Nitin Kadam) यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सद्गुरु शंकर महाराज मठ अशी पवित्र जागा देखील भाजपच्या गुंडांनी सोडली नाही..! तेथे देखील हाणामारीचा प्रकार. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हेच भाजपचे गुंड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटत होते..प्रश्न हा आहे की पोलीस आयुक्त कारवाईचे धाडस दाखवणार का..? pic.twitter.com/QiRdqV1M7K
— Nitin Madhukar Kadam – नितीन मधुकर कदम (@kadamnitin30) June 20, 2024
समोर आलेल्या माहितीनुसार, पुणे लोकसभा निवडणुकीत विजय झालेल्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ शंकर महाराजांच्या मठामध्ये दर्शन करण्यासाठी आले होते. त्यावेळीच भाजपच्या दोन गटात हाणामारी झाली.
धक्कादायक! UGC NET 2024 परीक्षेचा पेपर फक्त 5 हजारातच फुटला
या प्रकरणात नितीन कदम यांनी निशाणा साधत म्हणाले, सद्गुरु शंकर महाराज मठ एक पवित्र जागा आहे मात्र तिथे देखील भाजपच्या गुंडांकडून हाणामारी करण्यात येत आहे. त्यामुळे आता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या गुंडानी लोकसभा निवडणुकीत पैसे वाटले असा देखील आरोप नितीन कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
भारताचा ‘सूर्य’ चमकला, अफगाणिस्तान विरुद्ध ठोकले शानदार अर्धशतक; भारताने उभारली सर्वोच्च धावसंख्या