Download App

माझी भूमिका.., ऐतिहासिक विजयानंतर Satyajeet Tambe म्हणाले

अहमदनगर : नाशिक पदवीधरमध्ये ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर आता नवनिर्वचित आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) कोणती भूमिका घेणार आहेत, याची उत्सुकता लागलेली असतानाच तांबेंकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

माझी भूमिका उद्या 4 फेब्रुवारीला स्पष्ट करणार असल्याची प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या विजयानंतर दिलीय.

नाशिक पदवीधर मतदारसंघात झालेल्या ऐतिहासिक विजयानंतर सत्यजित तांबे म्हणाले, मला सर्वच पक्षांनी पाठबळ दिलं आहे, माझ्या विजयांनंतर अनेक लोकांकडून अभिनंदनाचे फोन आले आहेत.

त्या सर्वांचे सत्यजीत तांबे यांनी आभार मानले आहेत. तसेच निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं असून मी लोकांना प्रेम दिलं आहे, पैसे वाटले नाहीत. मी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होणार असल्याचा विश्वास सत्यजित तांबे यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांचा अखेर निकाल लागला असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निकाल लागला असून निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा ऐतिहासिक विजय झाला आहे.

दरम्यान, अनेक नाट्यमय घडामोडीनंतर 30 जानेवारीला या निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. तर 2 फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. आता निवडणुक निकालानंतर अपक्ष असलेले विजयी उमदेवार सत्यजित तांबे येत्या 4 फेब्रुवारीला काय भूमिका घेणार? याकडं राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय.

Tags

follow us