Nagapur Rain : रस्त्यावर तरंगणाऱ्या बसेस, दुकाने अन् घरांमध्ये पाणी; नागपुरात पावसाची ‘न भुतो न भविष्यती’ बॅटिंग

Nagapur Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. नागपूरमध्ये मात्र आपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसाने नागपूरमध्ये (Nagapur Rain) हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाने विस्कळीत झालेले […]

800

800

Nagapur Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. नागपूरमध्ये मात्र आपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. या पावसाने नागपूरमध्ये (Nagapur Rain) हाहाकार माजवला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पाऊस झाला. पावसाने विस्कळीत झालेले नागपुरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन संपूर्ण क्षमतेने मदत कार्याला लागले आहे.

Rohit Pawar : ‘मला अजितदादांसारखं व्हायचं नाही’; रोहित पवारांनी सांगितलं राजकारणात का आलो ?

शहरातील अनेक भागांत पाणीच पाणी :

नागपूर शहरामध्ये न भूतो ना भविष्यती असा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांत नागरिकांच्या घारात पाणी शिरले. बसस्थानकातील बस पाण्यात बुडाल्या आहेत. पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने महाविद्यालयांना आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

जयंत पाटील, आव्हाड, रोहित पवारांच्या आमदारकीवर टांगती तलवार; अजित पवार गटाचं मोठं पाऊल

दरम्यान हवामान विभागाने शुक्रवारी विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार नागपूरमध्ये पाऊस सुरूच होता. मात्र सायंकाळनंतर बा पाऊस इकका वाढाला की, शहरातील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या पावसाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे एका रात्रीत अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर झालेल्या पावसाने विस्कळीत झाले. नागपुरात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

फडणवीस बावनकुळेंनी घेतला आढावा

दरम्यान पूरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपाय-योजनाकरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मदत कार्य सुरू आहे. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या परिस्थितीचा आढावा घेतला. याबद्दल त्यांनी ट्विट करत माहिती दिली.

Exit mobile version