टायगर श्रॉफनंतर आता नागपुरातील सराफा व्यापारी बिश्नोई गँगच्या निशाण्यावर; आठ जणांकडे 80 लाखांची खंडणी मागितली

Nagpur Jewellers Extortion Threat Bishnoi Gang; मुंबईतील टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर आता नागपुरातही बिश्नोई गँगने खळबळ माजवली.

"प्रत्येक व्यापाऱ्याने 10 लाख रुपये द्या, दुकानाबाहेर 'जय श्री राम' लिहा"

"प्रत्येक व्यापाऱ्याने 10 लाख रुपये द्या, दुकानाबाहेर 'जय श्री राम' लिहा"

Nagpur Jewellers Extortion Threat Bishnoi Gang: मुंबईतील टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणानंतर आता नागपुरातही बिश्नोई गँगने खळबळ माजवली. शहरातील आठ सराफा व्यावसायिकांना धमकीची पत्रे मिळाली असून, या पत्रांमध्ये लॉरेन्स बिष्णोई गँगचा (Lawrence Bishnoi Gang) उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने 10 लाख रुपये द्यावेत, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

T20: मालिका भारताच्या नावावर, शेवटच्या सामन्यात पराभव; मालिकाविजयानंतर श्रेयस अय्यरने सांगितली चूक

दुकानाबाहेर ‘जय श्री राम’ लिहिण्याची अट

या पत्रांमधून व्यापाऱ्यांना थेट धमकावण्यात आले आहे. मागितलेली रक्कम न दिल्यास टायगर श्रॉफप्रमाणे गोळ्या घालून ठार मारू, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, खंडणी देण्याची तयारी असल्यास दुकानाबाहेर ‘जय श्री राम’ असे लिहिण्यास सांगण्यात आले आहे. या माध्यमातून पैसे देण्यास तयार असल्याचा संकेत मिळेल, असे पत्रात नमूद आहे. व्यापाऱ्यांना उद्देशून आक्षेपार्ह भाषेचाही वापर करण्यात आला आहे.

आठही पत्रांचे हस्ताक्षर सारखे

सर्व आठ व्यापाऱ्यांना पोस्टाद्वारे ही पत्रे पाठवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, पत्रांवरील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पत्रांचा स्रोत आणि धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; पडळकर आणि काँग्रेस आमनेसामने

या घटनेमुळे नागपुरातील सराफा व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ऑल इंडिया ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनीही व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे सांगितले. दरम्यान, पत्रांमध्ये बिष्णोई गँगचे नाव असले, तरी या धमकीमागे प्रत्यक्षात त्याच गँगचा सहभाग आहे का, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version