नागपुरात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आजही आक्रमक; पुन्हा ‘लोटांगण आंदोलना’चा इशारा….

हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच काल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक झाल्याचं दिसून आलं, आज पुन्हा आक्रमक पवित्रा घेतलायं.

Untitle (3)

Untitle (3)

Assembly Winter Session : नागपुरात सध्या सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच काल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक झाल्याचं दिसून आलं. या प्रशिक्षणार्थी आंदोलकांनी काल लोटांगण घालत विधानमंडळाचं विविध मागण्यांसाठी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलायं. मात्र, पोलिसांनी यातील 28 आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन हाणून पाडलंय. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा आंदोलकांनी लोटांगण घालण्याचा इशारा दिलायं. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे बालाजी साकूरकर यांनी माध्यमांशी बोलताना हा इशारा दिलायं.

केरळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; तब्बल चार दशकांपासूनचा डाव्या विचारांचा बालेकिल्ला भेदण्यात भाजपला यश

पुढे बोलताना साकूरकर म्हणाले, संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही आलो होतो पण पोलिसांनी हा अधिकार नाकारला. आम्ही गुन्ह्याला भीत नाही, शैक्षणिक विद्यार्थ्यांचं करीअर खराब होऊ नये म्हणून आम्ही शांत आहोत. आत्तापर्यंत अनेक आंदोलने केलेली आहेत पण यश मिळालं नाही. मुलांची नेमकी काय चूक आहे
आमची व्यथा लोटांगण घालत विधानमंडळात जाऊन देण्याचाी परवानगी पोलिसांनी द्यावी, अशी विनवणी साकूरकर यांनी यावेळी केलीयं.

Video : बार्टी अन् सारथीच्या PHD प्रवेश संख्येवर मर्यादा घालणार; अजितदादांची सभागृहात माहिती

कालच्या आंदोलनानंतर आज पुन्हा नागपुरात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहेत. आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा आज पुन्हा लोटांगण आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिलायं. आंदोलनाप्रकरणी पोलिसांनी 28 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज पुन्हा युवा प्रशिक्षणार्थी यशवंत स्टेडियमवर एकत्र आले आहेत. दरम्यान, काल झालेल्या आंदोलनादरम्यान, पोलिस-आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली असून आजही मागण्यांवर आंदोलनकर्ते ठाम असून आंदोलन असंच सुरु ठेवणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Exit mobile version