Namdev Shastri Maharaj Kirtan Cancel after backing Dhananjay Munde : बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडसह राज्याचं राजकारण तापलं आहे. या हत्येमागे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांसह विरोधकांकडूनही केला जात आहे. यावर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आता त्यांचं किर्तन देखील रद्द करण्यात आलं आहे.
वर्षावर राहायला का जात नाही? राऊतांच्या दाव्यानंतर स्वतः फडणवीसांचा खुलासा
नेमकं प्रकरण काय?
धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना शास्त्री म्हणाले की,‘धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी माझी चर्चा झाली. सर्व समजून घेतल्यानंतर असं जाणवलं की तो मुलगा राजकीय घराण्यात जन्माला आला आणि सर्व पक्षात त्याचे मित्र आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत आहे.’‘मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. राजकीय स्वार्थापोटी हे केला जात आहे. खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत. मुंडेंची पार्श्वभूमी ती नाही. आज मीडियाद्वारे जातीवाद पसरवला जात आहे. मात्र हा विषय किती ताणायचा हा ज्याने त्याने ठरवावं. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे’, असं देखील यावेळी शास्त्री म्हणाले.
त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील देहू येथील भंडारा डोंगरावर महंत नामदेव शास्त्री महाराज यांचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं. मात्र महंतांनी धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हद्यप्रकरणी आरोप होत असताना देखील पाठिंबा दिला. त्यावरून मराठा समाजाच्या संघटनांनी त्यांच्या कीर्तनाला विरोध केला. त्यामुळे संस्थांनी हे कीर्तन रद्द केले. तसेच त्यांच्याविझी डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना पाठिंबा देणे नामदेव शास्त्री यांना भोवलं आहे.
जेलमध्ये भेटायला वेळ नाही अन् सुटकेनंतर चव्हाणला कडाडून मिठी; मंत्री शिरसाटांचा अदित्य ठाकरेंना टोला