Download App

Nana Patekar : बाळासाहेबांनंतर मातोश्रीशी संबंध संपला; राज-उद्धव ठाकरेंवर नाना पाटेकर नाराज

  • Written By: Last Updated:

Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयावर बोलले आहेत. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनंतर राज आणि उद्धवशी ते नातं राहिलं नाही. कारण काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना पटत नाहीत. त्यामुळे नात एका बाजूने राहत नाही. असं म्हणत नाना यांनी ठाकरे बंधुंवर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील राजकारणावर देखील प्रतिक्रिया दिली.

राज-उद्धव ठाकरेंवर नाना पाटेकर नाराज

यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, बाळासाहेब होते तेव्हा ते मला आवर्जून फोन करायचे. भेटायला बोलवायचे. तो एक फोन होता आणि त्यांच्याशी एक नात होतं. मात्र बाळासाहेब ठाकरे केल्यानंतर मातोश्रीशी संबंध संपला. त्यानंतर मला फोन आले नाहीत. राजशी बोलले होते, उद्धवजी होते पण ते बंद झाले.

Fighter Song: हृतिक-दीपिकाच्या सिझलिंग केमिस्ट्री! ‘फायटर’मधील गाणे रिलीज

तसेच यावेळी राज ठाकरे यांच्यावर बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, राजवर माझा राग नाही. माझ्यावरही त्याचा राग नसेल. आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्याने केलेली कितीतरी भाकीत देखील खरी ठरली आहेत. मात्र मी जेव्हा राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यायला हवे. असे म्हटले होते. त्यावर राजने नानाला राजकारणात काय कळतं? त्याने नाक खूपसू नये. असं म्हटलं तुम्हाला खरंच कळत नाही. आपल्या इच्छा-सदिच्छा असतात त्या बोलतो. भावंड आहेत एकत्र यायला हरकत काय? एकमेकांशी रक्ताचा नात आहे. एकत्र बिघडलं कुठं? कारण त्यांच्या एकत्र येण्यातून काहीतरी चांगलं निघेल. असेही यावेळी नाना पाटेकर म्हणाले.

Manoj Jarange : अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार? मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल

मात्र यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावरची नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना पटत नाही. प्रत्येक गोष्ट पटायलाच हवी असं काही नाही. काही मत वेगळी असतात, त्यामुळे आता भेटायचं राहून गेलं. पण मी वाट पाहत होतो. मात्र आता ते नातं राहिलं नाही. कारण नात एका बाजूने राहत नाही. मी राजकडे घरी जायचो जेवायचो. मी तुमच्याकडून काय घेणार होतो? अथवा तुम्ही मला काय देणार होते? माझ्याकडे सगळेच आहे. मी आनंदी आहे. गरजा कमी आहेत. मला कुठले पुरस्कार नको आहेत. कशासाठी शिफारसही नकोय. असेही यावेळी नाना पाटेकर म्हणाले.

Tags

follow us