Download App

रिफायनरीसाठी लोकांचे टाळके फोडणे योग्य नाही… पटोलेंची सत्ताधाऱ्यांवर टीका

Nana Patole Critisizes BJP : सध्या कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राज्याचे वातावरण तापलेले पाहायला मिळते आहे. यातच या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. यावरून पोलीस व स्थानिकांमध्ये मोठा संघर्ष झाला. यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, बारसूमध्ये मी स्वतः जाऊन आलो होतो. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्याशी चर्चा करावी. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण पर्यावरण आणि नागरिकांचा विचार करावा. केवळ रिफायनरीसाठी लोकांचे टाळके फोडणे हे योग्य नाही अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

पुढे बोलताना पटोले म्हणाले, कोकणातला माणूस निसर्गप्रेमी आहे. नौकरीसाठी ते बाहेरगावी असले तरीही ते सणांना आपल्या घरी परत येतात. या प्रकल्पाला लोकांचा विरोध का आहे? सरकारने स्थानिकांशी चर्चा करायला हवी, सरकारच्या बगलबच्चांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

प्रकल्प कोकणात झाला पाहिजे त्याला कुणाचा विरोध नाही, पण आपल्या लोकांच्या जमिनीला जास्त भाव मिळावा म्हणून प्रकल्प रेटून धरणे उचित नाही. विदर्भातील प्रकल्प गुजरातला नेले, पण रिफायनरीचा प्रकल्प कोकणातच व्हावा, यासाठी हे सरकार आग्रही का आहे?” असा सवाल पेटोले यांनी केला.

राज्यात भाजपविरोधी लाट
भाजप शेतकरी विरोधी आहे. महागाईच्या माध्यमातून जगणे मुश्किल करून ठेवले आहे. राज्यातच नव्हे तर देशात भाजपविषयी प्रचंड संतापाची लाट आहे. हेच सध्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसते आहे. भाजपच्या विरोधात सध्या लाट आहे. आणि हेच आता निवडणुकीतील निकालाच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे. अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

महत्वाची बातमी! मे महिन्यात कसे असणार तापमान? पाहा हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील विविध भागात कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक पार पडली होती. दरम्यान या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का बसला आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याचे दिसले. मतदारांचा कौल पाहता राज्यात अनेक ठिकाणी शिंदे-फडणवीस सरकार पिछाडीवर पडले आहे. बाजार समिती निवडणुकीत राज्यात भाजपा विरोधात राग पाहायला मिळत आहे, असं नाना पटोले म्हणाले.

Tags

follow us