Download App

आंबेडकरांनी नेमका कुठला थर्मामीटर लावलायं? नानांचा उपरोधिक सवाल

Nana Patole Vs Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी नेमका कोणता थर्मामीटर लावलायं माहित नाही, असा उपरोधिक सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांनी आज मुंबईत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे.

Ahmednagar चे नामांतर ‘अहिल्यादेवी होळकरनगर’ करा; अन्यथा…; यशवंत सेनेचा इशारा

नाना पटोले म्हणाले, आम्ही अद्याप लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबद्दल कोणतीही भूमिका मांडलेली नाही. प्रकाश आंबेडकरांनी मला थंडाई गरम असं म्हटलंय. पण त्यांनी त्यासाठी कोणता थर्मामीटर लावलाय हे मला माहित नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.

‘लोकं फेसबुक लाइव्ह करणाऱ्या माणसाला मदत करतील का?’ शिंदेंचा खोचक सवाल

तसेच निवडणुकीत काँग्रेस स्थानिक पातळीवर नेत्यांशी चर्चा करुन वेळ आल्यास स्वतंत्र निवडणूक लढवणार अशी भूमिका आम्ही लोकल बॉडी निवडणुकीसाठी मांडली होती. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काय बोलवं, ते आमच्या महाविकास आघाडीमध्ये नाहीत म्हणून त्यांच्याबद्दल मी चर्चा करु शकत नसल्याचं म्हणत नाना पटोलेंनी पुढे बोलणं टाळलं आहे.

आकाश मधवालचा पंच, लखनऊला हरवून मुंबईने गाठली दुसरी क्वालिफायर

काय म्हणाले होते आंबेडकर?
नाना पटोले हे इंग्रजी चित्रपटासारखे ‘हॉट अन् ग्लो’ आहेत. नाना पटोले हे कभी ‘हवा गरम तर कभी नरम’ असं वक्तव्य ते करीत असतात. काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्यां ते नागपुरात म्हणाले होते. तर महाविकास आघाडीसोबत बसल्यास नाना पटोले एकत्र लढणार असल्याचं म्हणतात.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु असल्याचं दिसून आलं होतं. महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांनी जागांचे दावेदेखील केले होते. त्यावरुन नाना पटोलेंनी आपली भूमिका मांडली होती. नाना पटोलेंनी मांडलेल्या भूमिकेवरुन प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Tags

follow us