आकाश मधवालचा पंच, लखनऊला हरवून मुंबईने गाठली दुसरी क्वालिफायर

आकाश मधवालचा पंच, लखनऊला हरवून मुंबईने गाठली दुसरी क्वालिफायर

Eliminator LSG vs MI: आकाश मधवालच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर सामन्यात लखनऊचा 81 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईने दिलेल्या 183 धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संघ 16.3 षटकात 101 धावांत गारदर झाला. मुंबईकडून आकाश मधवालने 5 बळी घेतले. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने 40 धावांची खेळी केली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईची टीम दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. हा सामना 26 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातला चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुसरा क्वालिफायर जिंकणारा संघ अंतिम फेरीत चेन्नईशी भिडणार आहे.

लखनऊकडून मार्कस स्टॉइनिसने 27 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. सलामीवीर काइल मेयर्स 13 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. प्रेरक मंकड 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कृणाल पांड्यालाही विशेष काही करता आले नाही. तो 8 धावा करून बाद झाला. आयुष बडोनीने एक धाव केली. निकलोस पूरनला खातेही उघडता आले नाही. दीपक हुडाने 13 चेंडूत 15 धावा केल्या. कृष्णप्पा गौतम 2 धावा करून बाद झाला. लखनऊचा संघ 16.3 षटकांत 101 धावाच करू शकला.

IPL Playoff : 1 डॉट बॉल अन् 500 झाडं; BCCI सचिव जय शाह यांचा मेगा प्रोजेक्ट

मुंबईसाठी आकाश मधवालने भेदक गोलंदाजी केली. त्याने 3.3 षटकात केवळ 5 धावा देत 5 बळी घेतले. मधवालने प्रेरक मांकड, आयुष बडोनी, निकोलस पूरन, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मधवालसोबत ख्रिस जॉर्डननेही चांगली गोलंदाजी केली. त्याने 2 षटकात 7 धावा देऊन एक विकेट घेतली. तसेच एक मेडन ओव्हर काढला. पियुष चावलालाही एक विकेट मिळाली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 8 गडी गमावून 182 धावा केल्या. यादरम्यान कॅमेरून ग्रीनने 41 धावांची उपयुक्त खेळी खेळली. त्याने 23 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला. नेहल वढेरा 12 चेंडूत 23 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. सूर्यकुमार यादवने 20 चेंडूत 33 धावा केल्या. सूर्यानेही दोन चौकार आणि षटकार मारले. तिलक वर्माने 26 आणि टीम डेव्हिडने 11 धावा केल्या. सलामीवीर इशान किशन 15 धावा करून बाद झाला. रोहित शर्माला केवळ 11 धावा करता आल्या.

IPL फायनलमध्ये धोनी ब्रिगेडची धमाकेदार एन्ट्री, गुजरात टायटन्सचा दणदणीत पराभव

लखनऊकडून यश ठाकूरने 4 षटकात 34 धावा देत 3 बळी घेतले. नवीन-उल-हकने 4 षटकांत 38 धावा देत 4 बळी घेतले. मोहसीन खानने 3 षटकात 24 धावा देत एक विकेट घेतली. रवी बिश्नोई, कृणाल पांड्या आणि गौतम यांना एकही विकेट मिळाली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube