मुंबई : आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचच हिंदुत्व मानतो, कुण्या येऱ्या गबाळ्याचं मानत नसल्याचं ठामपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं आहे. नाना पटोले यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिक स्पष्ट केलीय.
Nitin Gadakari : नितीन गडकरी अतिरेकी संघटनांच्या रडारवर? पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर
नाना पटोले म्हणाले, ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. त्याचं स्वराज्याचं हिंदुत्व आम्ही मानत आहे. कुण्या येऱ्या गबाळ्याचं हिंदुत्व मानत नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन अद्यापही काँग्रेमध्ये रणकंदन सुरु असल्याचं दिसून येत आहे.
‘सावरकरांचं नाव घ्यायला लाज वाटू द्या’.. रघुनाथदादा शिंदे-फडणवीसांवर भडकले !
ठाण्याचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाण्यातून निघणाऱ्या काँग्रेसच्या सत्याग्रह यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो लावण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावरुन नाना पटोले यांना विचारण्यात आल्यानंतर सावरकरांविषयी त्यांनी आपली भूमिका मांडलीय.
पुण्यातील उद्योगपतीने ७५० कोटी मोजले : पण, सरकार महालात पाय ठेवू देईना
विक्रांत चव्हाण यांच्याकडे नाना पटोलेंनी खुलासा मागितला असून चव्हाण यांनी असं कुठलंही वक्तव्य केलं नसल्याचं नाना पटोलेंनी यावेळी सांगितलंय. तसेच शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला मान्य असून दुसऱ्या कोणाचंही मान्य नसल्याचं विधानही त्यांनी केलंय.
सावरकरांच्या मुद्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता पुन्हा काँग्रेस नेते राहुल गांधींनंतर नाना पटोलेंनी सावरकरांविषयी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यावरुन काँग्रेसमध्ये अजूनही सावरकरांविषयी कुजबूज सुरु असल्याचं दिसून येतंय.