‘सावरकरांचं नाव घ्यायला लाज वाटू द्या’.. रघुनाथदादा शिंदे-फडणवीसांवर भडकले !
Raghunath patil : राज्यात सध्या स्वातंत्र्यवीर सावकरांवरून जोरदार रणकंदन सुरू आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपने (BJP) सावरकर गौरव यात्रा काढली. पत्रकार परिषदांच्या माध्यमातून हल्लाबोल केला. यानंतर आता शेतकरी नेते रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांनी या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारवर आगपाखड केली आहे.
सावरकर गौरव यात्रेवरून पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरून संताप व्यक्त केला. ‘सावरकरांचं नाव घ्यायला तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत’, अशा शब्दांत त्यांनी सरकारचा समाचार घेतला. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
Ameesha Patel अडकली मोठ्या वादात; न्यायालयाकडून वॉरंट जारी… काय आहे नेमकं प्रकरण?
ते म्हणाले, ‘एकीकडे उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वज्रमूठ सभा होत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सावरकर प्रेम आलेलं आहे. सावरकरांचा विचार तुमच्याजवळ आजिबातच राहिलेला नाही. सावरकरांनी स्पष्ट सांगितले आहे, की गाय ही काही पवित्र प्राणी नाही. गाय उपयुक्त पशु आहे, अशी भूमिका मांडणारे सावरकर एका बाजूला आणि त्यांचे नाव व फोटो घेऊन तुम्ही गोवंश हत्या बंदीचा कायदा आणता ?, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे सावरकरांचे नाव घ्यायला’ अशी जळजळीत टीका त्यांनी सरकारवर केली.
शेतकऱ्यांवरच तुमची वज्रमूठ का ?
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभांवरही त्यांनी प्रहार केला. ते म्हणाले, ‘हे इकडे अशी वज्रमूठ काढतात. यांनी काय केलं शेतकऱ्यांसाठी ?, तुमच्या हातात साखर कारखानदारी आहे. केंद्रातही खासदार आहेत. शेतकरी विरोधी कायद्यांच्या बाबतीत काहीच बोलत नाही यांची वज्रमूठ. कुणावर चालवली वज्रमूठ शेतकऱ्यांवर का ?’, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
Akash Thosar : वडिलांबरोबरचा ‘तो’ किस्सा सांगत आकाश ठोसर झाला भावुक
‘आज एका एका दोरीवर चार चार शेतकरी फाशी घ्यायला लागले आहेत लाज वाटली पाहिजे या सत्ताधाऱ्यांना आणि वज्रमूठ सभा घेणाऱ्यांना.’ अशा शब्दांत पाटील यांनी संताप व्यक्त केला.