Ameesha Patel अडकली मोठ्या वादात; न्यायालयाकडून वॉरंट जारी… काय आहे नेमकं प्रकरण?
Amisha Patel : अभिनेत्री आणि निर्माती अमिषा पटेलच्या (Amisha Patel) अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अभिनेत्रीविरोधात न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. अनेकवेळा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्यानंतर देखील हजर न झाल्याने अमिषा पटेलविरोधात झारझंडमधील (Jharkhand) रांची दिवाणी न्यायालयाने (Ranchi Diwani Court) वॉरंट जारी केलं आहे.
झारखंड येथील रांची दिवाणी न्यायालयाने अमिषा पटेल आणि तिचा बिझनेस पार्टनस कुणाल विरुद्ध फसवणूक, धमकी आणि चेक बाऊन्स प्रकरणी वॉरंट जारी करण्यात आले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ एप्रिलला होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार अरगोरा येथे राहणाऱ्या अजय कुमार सिंह यांनी २०१८ मध्ये अमिषा पटेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीत त्यांनी सांगितले होते की, अमिषा पटेलने सिनेमा बनवण्याच्या नावाखाली आमच्याकडून अडीच कोटी रुपये घेतले होते. पण अद्याप या सिनेमाची निर्मिती झाली नाही. तसेच अमिषाने आम्हाला पैसेही परत केले नाहीत.
अजय कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमिषा पटेल आणि तिचा भागीदार असलेल्या कुणालने सिनेमा पूर्ण झाल्यावर व्याजासह पैसे परत करणार असल्याचे सांगितले होते. ‘देसी मॅजिक’ या सिनेमाचं शूटिंग २०१३ साली सुरू झालं होतं. पण अद्याप हा सिनेमा प्रदर्शित झाला नाही. सिनेमा प्रदर्शित न झाल्याने अजय कुमार यांनी अभिनेत्रीकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने अजय कुमार यांना त्यांचे पैसे परत केले नाही.
Gautami Patil : कपडे बदलतांनाचा ‘त्या’ व्हिडिओवरून गौतमी पाटीलचा खुलासा
अमिषाने ऑक्टोबर २०१८ मध्ये अजय कुमार यांना अडीच कोटी आणि ५० लाख रुपयांचे २ चेक दिले होते. पण ते बाऊन्स झाले. आता रांची येथील दिवाणी न्यायालयाने अमिषा विरोधात वॉरंट जारी केले आहे. अनेकवेळा समन्स पाठवल्यानंतर देखील कोर्टात हजर न झाल्याने तसेच तिच्या वकिलांनादेखील कोर्टात पाठवत नसल्यामुळे अमिषा विरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे.
अभिनेत्री विरोधात तक्रार करणारे अजय कुमार सिंह हे झारखंडमधील सिनेमा निर्माते आहेत. अमिषा पटेल ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि निर्माती आहे. अमिषाने २ हजार साली ‘कहो ना प्यार है’ या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. या सिनेमात ती ऋतिक रोशनबरोबर झळकली होती. यानंतर तिने ‘गदर एक प्रेम कथा’, ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या लोकप्रिय सिनेमामध्ये काम केले आहे.