Gautami Patil : कपडे बदलतांनाचा ‘त्या’ व्हिडिओवरून गौतमी पाटीलचा खुलासा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 06T171307.922

Gautami Patil : सबसे कातील गौतमी पाटील अशी सोशल मीडिया (Social media) स्टार आणि डान्सर (Dancer) पुन्हा एकदा चर्चेत आली. दिवसेंदिवस गौतमीच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. (Gautami Patil Viral Video) तसेच गौतमीच्या डान्सचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल (Viral)  होत असलयाचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)


अनेक कार्यक्रमानिमित्त तिचे डान्स शो आयोजित केले जात असतात. तिच्या या कार्यक्रमाला हजारो चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. अनेकदा तिच्या कार्यक्रमात तरुणांनी धुडगूस घातल्याची माहिती देखील समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर आता तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटीलचा काही दिवसांपूर्वी कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणीतरी लूपन हा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरल केला होता. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून गौतमी व्हॅनिटी व्हॅन वापरते. याबाबत तिने नुकतेच एका टीव्हीच्या मुलाखतीत सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)


गौतमी म्हणाली, व्हॅनिटी व्हॅनच पाहिजे असे माझे काही नाही. मी अगोदर पडद्याच्या रुममध्ये देखील कपडे बदलले आहेत. पण माझा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मी काळजी घेते. म्हणून मी व्हॅनिटी व्हॅन वापरत असल्याचा खुलासा तिने केला आहे. त्यानंतर मी व्हॅनिटी व्हॅन असली पाहिजे, असे आयोजकांना सांगते. पण, जर व्हॅनिटी व्हॅन शक्य नसेल, तर चार भिंती असलेली व्यवस्थित रुम द्या, एवढेच माझे म्हणणे असते. असा खुलासा तिने यावेळी केला आहे.

Khatron Ke Khiladi 13: ‘खतरो के खिलाडी’ च्या या सिझनमध्ये दिसणार हे स्पर्धक

गौतमी पाटीलच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. गौतमीच्या डान्सवर आक्षेप घेत ती अश्लील डान्स करत असल्याची टीका देखील जोरदार सुरु आहे. त्यानंतर डान्समध्ये सुधारणा केल्याचे गौतमी पाटीलने स्पष्ट केले होते.

Tags

follow us