Download App

Narhari Zirwal : पांढरा सदरा, गांधी टोपी आणि हिरवं लुगडं; जपान दौऱ्यापूर्वीचा झिरवळांचा लूक चर्चेत

  • Written By: Last Updated:

राज्यातील काही आमदार काल अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झालेल्या अभ्यासगटामध्ये राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचाही समावेश आहे. त्यामुळे झिरवळ देखील अभ्यास दौऱ्यासाठी जपानला गेले आहेत. पण जपानला रवाना होण्यापूर्वी नरहरी झिरवळ यांचा त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Sheetal Mhatre : लाचारांची स्वारी ‘सिल्व्हर ओक’च्या दारी…

नरहरी झिरवळ आणित्यांच्या पत्नीसोबतचा हा फोटो मुंबई विमानतळावरील आहे. स्वतः नरहरी झिरवळ यांनीच आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला होता. सोबत राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखेतर्फे ११ ते २३ एप्रिल या कालावधीत जपान या देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे, या दौऱ्याच्या निमित्ताने जपान येथे रवाना होताना, असं कॅप्शन लिहलं आहे.

नरहरी झिरवळ हे सध्या विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या साधेपणासाठी ते जाणले जातात. याचमुळे परदेशात जातानाही झिरवळ यांनी आपला साधेपणा सोडला नाही. त्यांचा हाच साधेपणा या फोटोतून दिसतो आहे. या फोटोत स्वतः नरहरी झिरवळ हे त्यांच्या नेहमीच्या सदरा-लेंगा आणि डोक्यावर गांधी टोपी अशा पेहरावात होते. तर त्यांच्या पत्नीने हिरव्या रंगाचं नऊवारी लुगडं नेसलं होतं. त्यामुळे आपली पारंपारिक ओळख घेऊनच हे पती-पत्नी दोघेही परदेशात गेले आहेत. त्यामुळे अनेकजण त्यांचे कौतुक करत आहेत. त्यामुळे झिरवळ दाम्पत्याचा हा हसतमुख फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Gulabrao Patil : त्यांच्याकडे दुसरे भांडवलचं नाही, गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

या फोटोवर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. सलीम नावाच्या एका ट्विटर युजरने, “किती साधेपणा आहे या नात्यात … काही माणसं उगाच मोठी होत नाहीत.., हा साधेपणाच माणसाला आयुष्यात मोठं करत असतो… दोघांनाही प्रवासासाठी शुभेच्छा” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर विनायक नावाच्या युजरने, “राजकीय टिप्पणी न करता तुमच्या साधेपणाला सलाम करावा वाटतो. आपल्या मंडळी च्या चेहऱ्यावर जे हास्य आहे हे त्याच मोल कुठच होत नाही. आपली संस्कृती सोबत ठेवून तुम्ही जपान पाहताय बरं वाटलं. नाही तर बाकी राजकारणी अभ्यास दौऱ्या च्या नावा खाली कोणाकोणाला घेवून जातात हे न सांगितलेलं च बरं.” असा खोचक टोला इतर नेत्यांना लगावला आहे.

Tags

follow us