नारायणपूर येथील सद्गुरू नारायण महाराज यांचं वृद्धापकाळानं निधन; ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

श्रीक्षेत्र नारायणपूर (तालुका पुरंदर) येथील नारायण महाराज यांचं निधन! नारायणपूर येथील दत्त मंदिरात भाविकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नारायणपूर येथील सद्गुरू नारायण महाराज यांचं वृद्धापकाळानं निधन; ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नारायणपूर येथील सद्गुरू नारायण महाराज यांचं वृद्धापकाळानं निधन; ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sadguru Narayan Maharaj passed away : श्रीक्षेत्र नारायणपूर (तालुका पुरंदर) येथील नारायण महाराज यांचं कालं सोमवारी,(दि 9 सप्टेंबर)रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास निधन झालं. वृद्धापकाळाने नारायण महाराज (Narayan Maharaj) यांचं निधन झालं आहे. ते 85 वर्षांचे होते. नारायणपूर येथील दत्त मंदिरात नारायण महाराज यांचं वास्तव्य होतं. नारायपूरला एक मुखी दत्त मंदिर आहे, तिथेच ते राहायला होते.

आज मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

दुपारी 4 वाजता पार पडणार अंत्यसंस्कार

भाविकांचे श्रद्धास्थान परमपुज्य निश्खचैतन्य श्री सदगुरु नारायण महाराज हे ‘अण्णा’ या नावाने ओळखले जायचे. राज्यभरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे. नारायण महाराजांचं पार्थिव सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी नारायणपूर येथील मंदिरात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 4 वाजता नारायणपूर येथील यज्ञकुंडाजवळ पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. नारायण महाराज यांच्या जाण्याने भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारतातील चार दिशांना चार दत्तधाम बांधले

नारायण महाराज हे विविध समाजकार्यात नेहमी अग्रेसर असायचे. सामुदायिक विवाह सोहळ्याला त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिलं. गावोगावी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ, सामुदायिक शेती आणि श्रमदानाचे उपक्रम राबवले. नारायण महाराजांनी भारतातील चार दिशांना चार दत्तधाम बांधले, त्यापैकीच एक नारायणपूर आहे.

 

———-

——–

Exit mobile version