आज मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

आज अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची (Maharashtra Rain) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Weather Update

Maharashtra Rain Update : राज्यात गणेशोत्सवाच्या काळात पाऊस (Ganesh Festival) होत आहे. आज अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची (Maharashtra Rain) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उद्या बुधवारी देखील ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Rain Alert) व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.

सावधान! येत्या 48 तासांत मुसळधार बरसणार; विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

मराठवाड्यातील जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. पुण्यासह घाटमाथ्यावर मात्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी तुरळक ठिकाणी पाऊस झाला. त्यानंतर मात्र पुणे आणि सातारा वगळता अन्यत्र पाऊस झाला नाही.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे.

follow us