सावधान! येत्या 48 तासांत मुसळधार बरसणार; विदर्भ, मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
Maharashtra Rain : राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत (Maharashtra Rain) आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळला. काल सोमवारी बैल पोळ्याच्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने (Weather Update) हाहाकार उडाला. सोलापूर आणि नगर जिल्ह्यातही (Rain Alert) कुठे जोरदार तर कुठे संततधार पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील पाथरीत अतिमुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत शेतकरी तर कन्नड तालु्क्यातील घाटशेंद्रा येथे 18 महिन्यांचे मूल पाण्यात वाहून गेले. यानतंर आता पुढील दोन दिवस पावसाची हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Andhra Pradesh Rain: पावसाचा हाहाकार, आंध्र प्रदेशात भूस्खलनामुळे 4 जणांचा मृत्यू
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेलंगाणा आणि विदर्भावरील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. तरीही दोन दिवसांत पावसाचा जोर कमी होईल याची शक्यता दिसत नाही. आज आणि उद्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल. विदर्भातील बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर दिसून येईल. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
2 Sept, latest satellite obs at 7.15 pm.
Mod to dense clouds over parts of Marathwada, N Madhya Maharashtra & adjoining areas.
Watch for intermittent intense spells over these areas during next 3,4 hrs.
Watch for imd updates pl pic.twitter.com/qoFALeKIZv— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 2, 2024
नाशिक जिल्ह्यात दिवसभर ढगाळ हवामान राहिल अशी शक्यता आहे. नगर आणि पुणे जिल्ह्याला (Pune Rains) मात्र पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीचा पावसाचा आकडा पार झाला आहे. मुंबईतील पावसानं सरासरी हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. तर, जुलै महिन्याची सरासरी अवघ्या 14 दिवसांत पूर्ण करण्यात आली आहे. जुलै मध्यपर्यंतच पावसानं जुलै महिन्याच्या सरासरी एवढ्या पावसाचा टप्पा पार केला आहे.