Beed Loksabha : बजरंग सोनवणेंची निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी, ‘अन्यथा स्वत:ला संपवून घेऊ…

Beed Loksabha : बजरंग सोनवणेंची निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी, ‘अन्यथा स्वत:ला संपवून घेऊ…

Bajrang Sonawane : बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघ हा चर्चेतील मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपकडून (BJP) पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणेंमध्ये (Bajrang Sonawane) लढत आहे. आज सोनवणेंनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांनाच धमकी दिली. निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळेंना सोनवणे यांनी धमकी दिली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली.

Baichung Bhutia ने देशासाठी गोल डागले ! पण राजकारणात सहाव्यांदा मतदारांकडून ‘रेड कार्डच 

बजरंग सोनवणे यांनी आज स्ट्राँग रूमची पाहणी केली. या पाहणी दरम्यान बजरंग सोनवणे आणि निवडणूक निर्णय ऑफिसर महेंद्र कांबळे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलतांना सोनवणेंनी चक्क कांबळेंनी धमकी दिली. ‘कांबळे साहेब हात आकडू नका, अन्यथा स्वत:ला संपवून घेऊ का? अशी धमकी सोनवणेंनी दिली.

हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास होणार सुस्साट; ताशी 85 किमी वेगाने धावणारे मेट्रोचे डब्बे दाखल 

त्यानंतर माध्यमांशी बोलतांना सोनवणे यांनी सांगितलं की, तुम्ही प्रशानस मदत करा… मदत आपण नियमाप्रमाणे केली पाहिजे. मी काय बोललो ही विषय नाही. त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली तर बीड जिल्हा काय म्हणेल? त्यांनी लोकशाही जिवंत ठेवावी, असं माध्यमांशी बोलतांना सोनवणे म्हणाले.

‘…म्हणून स्ट्राँग रूमला आलो’

स्ट्राँग रूममध्ये येण्याचे कारण म्हणजे जिल्हाधिकारी इथे आहेत. मला त्यांच्याशी काहीतरी चर्चा करायची आहे. त्यामुळं मी इथे आलो आहे. त्यांनी मला काही गोष्टी विचारल्या आहेत. त्यामुळं त्यांनी प्रत्यक्षात येऊन बोलतो, असं म्हणालो. शिवाय, मी येथे स्ट्राँग रूमची पाहणी करण्यासाठी आलो आहे, असं सोनवणे म्हणाले.

मी 100 टक्के निवडून येणार – सोनवणे
पंकजा मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून येतील असा पोलस्ट्रॅटचा अंदाज आहे. दरम्यान, एक्झिट पोलवर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील निवडणूक ही विकासावर आधारित आहे. जातीपातीची फक्त चर्चा जाली. महाराष्ट्रातील मूड महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. बीड जिल्ह्यातही तोच मूड आहे. हे सर्वे कसे केले हे मला माहीत नाही. पण, बीड लोकसभा निवडणुकीत मी 100 टक्के निवडून येणार असल्याचे ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज