बीडची बदनामी अन् अजितदादांसमोरच मुंडे, धस, सोनावणेंमध्ये बाचाबाची; जिल्हा नियोजन बैठकीत घडलं काय?

  • Written By: Published:
बीडची बदनामी अन् अजितदादांसमोरच मुंडे, धस, सोनावणेंमध्ये बाचाबाची; जिल्हा नियोजन बैठकीत घडलं काय?

Bajrang Sonawane On Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे (Sarpanch Santosh Deshmukh) सध्या बीडचे (Beed) राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्यावर देखील गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आले आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक (Beed DPDC Meeting) पार पडली.

या बैठकीत दहशतीच्या मुद्द्यावरुन बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) , भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात बाचाबाची झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहे. आज त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील पहिली नियोजन समितीची बैठक घेतली आणि या बैठकीत बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि पहिल्यांदाच शिस्तीत बैठक पार पडली असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. तसेत या बैठकीत अनुपालन झालं, मागचा आराखडा झाला, अजित पवारांनी सर्व आढावा घेतला. असेही यावेळी ते म्हणाले.

तर या बैठकीत मी रेल्वे संदर्भात प्रस्ताव मांडला असून आता बीडच्या विमानतळासाठी प्रयत्न करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. याच बरोबर बीड जिल्ह्यात चुकीच्या पद्धतीने अनेक कामांना मान्यता देण्यात आल्या आहे. सीईओंनी आराखड्यात नसणाऱ्या कामांना मान्यता दिल्या आहेत. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. तर दहशतीच्या मुद्द्यावरुन मंत्री धनंजय मुंडे आणि माझ्यात बाचाबाची झाली असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

अजित पवार करणार मोठी घोषणा, लाडक्या बहि‍णींना ‘या’ दिवशी मिळणार 2100 रुपये

माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दहशत आहे. असं या बैठकीत धनंजय मुंडे म्हणाले. त्यावर कोणाची दहशत आहे हे उघड करा.असं खासदार सोनवणे म्हणाले. तर गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्याची बदनामी करण्यात येत आहे. असं देखील मंत्री धनंजय मुंडे म्हणाले तर यावर भाजप आमदार सुरेश धस आणि खासदार सोनवणे यांनी कोण बीड जिल्ह्याची बदनामी करत आहे? असा सवाल केला. तसेच आम्ही फक्त सत्य परिस्थिती मांडत आहे. असं देखील खासदार सोनवणे आणि भाजप आमदार सुरेश धस म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube