मी प्रेस घेतल्यास खासदाराची.. सहाय्यक पोलीस निरीक्षकाची खासदार बजरंग सोनवणेंना थेट धमकी
Bajrang Sonwane : बीडच्या जिल्हा पोलीस प्रेस व्हॉट्सअॅप ग्रुपवर (Bajrang Sonwane) एका सहाय्यक पोलीस निरीक्षकानेच खासदार बजरंग सोनवणे यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट केली. या पोस्टनंतर काही वेळातच वरिष्ठांकडून त्यांना रिमुव्ह करण्यात आलं. मात्र, पोलिसांनीच खासदारांविरोधात केलेल्या पोस्टने चर्चेचा विषय बनला आहे.
अजितदादा क्या हुआ तेरा वादा, सुरेश धसांचा परभणीतून हल्लाबोल, मुडेंनाही सुनावलं
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहेत. बीड पोलीस प्रेस ग्रुपवर त्यांनी शनिवारी एक पोस्ट केली. ज्यात खासदार बजरंग सोनवणे यांच्या विरोधात वादग्रस्त लिखाण होते. बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आणि आज गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या या ग्रुपवर ही पोस्ट केली.
गणेश मुंडे यांनी पोस्टमध्ये काय
गणेश मुंडे यांनी एसपींच्या अधिपत्याखाली सुरु केलेल्या बीड पोलीस प्रेस या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शनिवारी (4 जानेवारी) रोजी सायंकाळी एक पोस्ट केली. यामध्ये ”या खासदाराची चड्डीसुद्धा जागेवर राहणार नाही, मी प्रेस घेतली तर असं म्हटलं. या पोस्टनंतर खासदार कोण?, अशी विचारणा देखील काही पत्रकारांनी ग्रुपवर केली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी गणेश मुंडे यांना सदर ग्रुपमधून काढून टाकले.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून एक आरोपी अजूनही फरार आहे. दरम्यान याप्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी बजरंग सोनावणे यांनी केली आहे. तसेच बजरंग सोनावणे यांनी गणेश मुंडे आणि दहिफळे या दोन सहाय्यक पोलीस निरिक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे.
14 दिवसांची सीआयडी कोठडी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे.