बिग बॉसमध्ये फक्त टीआरपीसाठी… वादग्रस्त दाखवलं जायचं; घनश्याम दरोडेनी केला खळबळजनक खुलासा

बिग बॉसमध्ये फक्त टीआरपीसाठी… वादग्रस्त दाखवलं जायचं; घनश्याम दरोडेनी केला खळबळजनक खुलासा

Ghanshyam Darode Interview After His Birthday : मराठी रिअॅलिटी शो बिग बॉस (Bigg Boss) फेम घनश्याम दरोडेचा वाढदिवस पार पडला. त्यानंतर लेट्सअप मराठीने घनश्यामसोबत (Ghanshyam Darode) संवाद साधलाय. यावेळी बिग बॉसमधील प्रवासावर बोलताना घनश्याम म्हणाला की, सर्वांनी मला खूप सपोर्ट केला. आज माझी असणारी लाईफ या सगळ्यांमुळे आहे. अभिषेक सरांनी मला पहिला फोन केला होता. प्रथमेश सर अन् केतन सरांनी खूप सांभाळून घेतलं, असं देखील घनश्याम दरोडे म्हणाला आहे. बिग बॉस हे भांडण्याचं घर नसून एक विचारांचं घर असल्याचं घनश्याम म्हणाला.

म्हणजे खूप वेगळा अनुभव होता. त्या घरात सगळीकडे कॅमेरे होते. माईकवर हात ठेवण्याचा अधिकार नव्हता. छोट्या-छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष होतं. 24 तासांचं रेकॉर्डिंग दीड तासात दाखवलं जात होतं. फक्त टीआरपीसाठी वादग्रस्त होतं, ते दाखवलं जात होतं. केदार शिंदेंनी देखील कौतुक केलंय. मी माझ्या चाहतेवर्गाला सोडून केव्हा राहिलेलो नाही. आईवडिलांना केव्हा सोडलेलो नाही, पण बिग बॉसच्या घरात खूप वेगळं स्ट्रगल होतं. घरचे मला बिग बॉस करण्यासाठी विरोध करत होता. प्रत्येक आठवड्याला मला कॅल्शियमचं इंजेक्शन दिलं जातं. मला थॉयरॉईड असून मला एकुलता एक असल्यामुळे घरचे जास्त जपतात, असं घनश्याम म्हणाला आहे.

एका लाडक्या बहिणीने भावाची इज्जत तारली, तर दुसरीने वेशीवर टांगली ; घनश्यामचा निक्कीला टोला

त्यापूर्वी घरच्यांनी बिग बॉसचा शो कधीही पाहिलेला नाही. बिग बॉसमध्ये मी मतं मांडण्यासाठी अन् लढण्यासाठी गेलो होतो. विचारांनी लढा असं देखील घनश्याम म्हणाला. मला राजकारणात उतरण्यापेक्षा समाजकारण केलं पाहिजे. मोठं झाल्यानंतर गोरगरिबांना विसरून जायचं, हेच मला पटत नाही. सत्तेशिवाय गणितं बदलत नाही, त्यामुळे राजकारणात उतरावं असं वाटतंय. लोकप्रतिनिधींसोबत गावाच्या रस्त्याबाबत बोललो आहे, पण आता गावकरी थकलेत. विक्रमदादा पाचपुते हे सत्तेत आलेत. मी लहान भाऊ म्हणून विनंती करेन की, सत्तेत येण्याआधी जो शब्द दिला होता, तो रस्ता मंजूर करावा.

पोलिसांसमोर हजर व्हायचं की नाही, वाल्मिक कराड अन् ‘आकां’मध्ये द्वंदयुद्ध; सुरेश धसांनी नवा बॉम्ब फोडला

राजकारणात येण्यासाठी मला बऱ्याच पक्षांकडून ऑफर येत आहेत. बोलण्यापेक्षा कृती करणं महत्वाचं आहे. त्यामुळे माझा फोकस अभिनय अन् राजकारणाकडे देखील आहे. मी जनतेच्या संपर्कात आहे, त्यामुळे पक्षाची, चिन्हाची गरज आहे. त्यामुळे मी कोणाशी संपर्क करत नाही. मी शेतकऱ्यांसाठी लढणार, शेतकऱ्यांसाठी उभं राहणार. तुम्ही समाजासाठी काय करता, हे महत्वाचं आहे. अभिनय क्षेत्रातून देखील जनजागृती करता येतेय. मराठी सिनेमा रिलीज झाल्यानंतर सिनेमागृहात जावून बघा, असं घनश्यामने मराठी प्रेक्षकांना आवाहन केलंय.

मराठीला पाठीमागे खेचलं जात नाहीये, हिंदी बिग बॉसचे सिझन अठरा झाले असून नंबर वन टीआरपी मराठीची आहे. कोणीही मराठी शोवर दडपण आणू नका. समझने वालों को इशारा काफी आहे, असं देखील घनश्याम दरोडे म्हणाला. निक्कीने माझी पप्पी घेतली, अन् तो सिन हायलाईट झाला. मला नंतर कळल्यावर धक्का बसला. बिग बॉसने आम्ही बहिण-भाऊ झाल्याचं दाखवलंच नाही. भविष्यात हिंदी बिग बॉसची ऑफर आल्यास मी करणार नाही, असं देखील घनश्याम दरोडेनी सांगितलं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube