Bigg Boss Marathi: तोंडाला तोंड लागतंय, धनंजय आणि छोट्या पुढारीमध्ये पडली वादाची ठिणगी
Bigg Boss Marathi Day 13 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरातील सदस्य कधी एकमेकांसोबत चांगले असतील आणि कधी त्यांच्यात वाद निर्माण होईल हे सांगू शकत नाही. (Bigg Boss Marathi ) आजच्या भागातही छोटा पुढारी घन:श्याम दरवडे (Ghanshyam Darode) आणि धनंजय पवारमध्ये (Dhananjay Pawar) शाब्दिक चकमक झालेली पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये धनंजय पुढारीला विचारतोय,”पुढारी तुमच्याकडे किती कामं आहेत?”. त्यावर पुढारी एक असं उत्तर देतो. त्यावर धनंजय म्हणतो,”तोंड शिवलं होतं का आता विचारताना”. त्यानंतर छोटा पुढारी घन:श्यामला म्हणतो,”तोंड शिवलं का ही कोणती पद्धत आहे बोलायची”. त्यावर धनंजय म्हणतो,”मला वाटेल ते मी बोलेल”.
View this post on Instagram
आजच्या Top हेडलाईनमध्ये नेमकं काय असणार?
‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज ‘कल्ला न्यूज’चा सेगमेंट पार पडणार आहे. या कल्ला न्यूज सर्वांचच लक्ष वेधून घेणार आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर, गोलीगत सूरज चव्हाण आणि धनंजय पवार हेडलाईन्स वाचताना दिसणार आहेत.’बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून अनेक बातम्या चांगल्याच गाजल्या. अश्रूंचा पूर ते प्रेमाचा गेमपर्यंत अनेक बातम्या नेटकऱ्यांनी आवडीने वाचल्या.
आज कल्ला न्यूजमध्ये धनंजय पवार पहिली हेडलाईन वाचताना दिसत आहे. धनंजय पवार म्हणतोय,”बिग बॉस’च्या घरात आलाय अश्रूंचा पूर, हरवून बसलेत खेळातला सूर…सांगा सूरज भाऊ कोण?” त्यावर सूरज आर्याचं नाव घेतो. त्यानंतर अंकिता पुढची हेडलाईन वाचत म्हणते,”बिग बॉस’च्या घरात फुलतंय प्रेम की सुरू आहे प्रेमाचाच गेम”. निक्की आणि अरबाजसाठी ही हेडलाईन असते. त्यानंतर धनंजय पुढची हेडलाईन वाचत म्हणतो,”बाहेर असतोय टीमचा कॅप्टन आणि इथं मात्र आहे आहे रात्रीचा गडी”. त्यावर अंकिता आणि सूरज धनंजयचच नाव घेतात.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘कल्ला न्यूज’ पाहण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावाच लागेल. मनोरंजनासह सदस्यांना सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न या कल्ला न्यूजच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
Bigg Boss Marathi: लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग; अरबाज पचवू शकेल का?
सूरजला गेम कळला नाही, पण त्याला माणसं कळली
गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ कळलाच नाही, अशी चर्चा होऊ लागली आहे. मात्र त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील सूरजच्या खेळीचं कौतुक केलं. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.