आपलं कोण परकं कोण? म्हणत निक्की- अरबाजवर छोटा पुढारी भडकला

Ghanshyam Darode : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या सीझनमध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यासह छोटा पुढारी

  • Written By: Published:
Ghanshyam Darode

Ghanshyam Darode : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या सीझनमध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्यासह छोटा पुढारी घन:श्याम दरवडेची (Ghanshyam Darode) सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. बिग बॉसच्या घरात घन:श्याम दरवडे निक्कीला ‘निकू ताई’ तर अरबाजला दाजी म्हणत होता पण आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये छोटा पुढारी घन:श्याम दरवडे निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अरबाज पटेल (Arbaaz Patel) यांच्यावर नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे.

माहितीनुसार, घन:श्यामनच्या वाढदिवसानिमित्त त्याने एका कार्यक्रमाचं आयोजन केले होते आणि या कार्यक्रमात निक्की आणि अरबाज यावं अशी त्याची इच्छा होती. या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी घन:श्याम निक्की आणि अरबाजच्या घरी देखील गेला होता. या कार्यक्रमाला येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली होती मात्र दोन्ही या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने आता छोटा पुढारी घन:श्याम दरवडे नाराज झाला असून त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

घन:श्याम दरवडे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज समजलं दिलेला शब्द खरा कोण करतं ..? कोण फक्त बोलतं ..?कोण माझ्यासाठी आले ..? आपलं कोण परकं कोण तुम्ही ठरवा आता… असं त्यानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे घन:श्यामच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील त्याला ट्रोल केलं आहे. अरबाज आणि निक्कीने फक्त तुझा वापर केला आणि हे तुला आता समजत आहे. तू आपल्या लोकांना सपोर्ट केला अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chota Pudhari official(Ganesh Daravade) (@chotapudhari_official)

पदभार स्वीकारताच धनंजय मुंडे अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभागाचा आढाव घेत अधिकाऱ्यांना दिले सूचना

तर दुसरीकडे घन:श्यामच्या वाढदिवसाचा कार्यक्रम त्याच्या गावी पार पडला या कार्यक्रमासाठी जान्हवी किल्लेकर आणि किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांनी हजेरी लावली होती. सध्या या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

follow us