हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास होणार सुस्साट; ताशी 85 किमी वेगाने धावणारे मेट्रोचे डब्बे दाखल

हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवास होणार सुस्साट; ताशी 85 किमी वेगाने धावणारे मेट्रोचे डब्बे दाखल

Hinjewadi to Shivajinagar Metro Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) 1 ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) दोन मार्गांचे उद्घाटन केलं होतं. त्यानंतर आता मेट्रोचा तिसरा टप्पा कधी सुरू होणार? याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय. दरम्यान, मेट्रोच्या तिसऱ्या टप्पासंदर्भात महत्वाची अपडेट आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्र (Hinjewadi to Shivajinagar Metro) प्रकल्पाची पहिली मेट्रो पुण्यात दाखल झाली आहे.

खास फोटो शेअर करत आमिरच्या लेकाला दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रांच्या खास शुभेच्छा! 

अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी (आंध्र प्रदेश) येथील कारखान्यात विकसित केलेली ही तीन डब्यांची मेट्रो ट्रेन पूर्णपणे स्वदेशी आहे. आज (2 जून) रोजी मेट्रो माण स्थानकात दाखल झाली आहे. या मेट्रोमुळं वाकड, हिंजवडी परिसरातील नागरिकांना पुण्यात जाणे-येणे सोयीचे होणार आहे.

KKR ला चॅम्पियन बनवणारा व्यंकटेश अय्यर विवाह बंधनात; पाहा पत्नी श्रुती रघुनाथनसोबतचे खास फोटो 

टाटा समूहाच्या वतीने, अलस्टॉम कंपनीला या प्रकल्पासाठी तीन डबे असलेल्या एकूण 22 ट्रेनसेट पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ताशी 85 किलोमीटर वेगाने धावू शकणाऱ्या या प्रत्येक ट्रेनमध्ये एका ट्रिपमध्ये सुमारे 1,000 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर दररोज प्रवास करताना पुणेकरांना अतिशय सुखद अनुभव मिळावा, अशा पद्धतीने या गाड्यांची रचना करण्यात आली आहे. या गाड्यांची अंतर्गत रचना आणि सजावट करतांना प्रवाशांच्या गरजा आणि आराम याकडे लक्ष दिले आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील प्रकल्पाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि टाटा समूहाने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर हाती घेतले. त्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष उद्देश वाहन कंपनी (SPV) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे आयटी सिटी मेट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आलोक कपूर म्हणाले, “पुणे मेट्रो लाइन 3 साठीच्या ट्रेनमध्ये थर्ड रेल सिस्टीम आणि रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हिंजवडी आयटी हबला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या या गाड्या ताशी 85 किमी वेगाने धावतील, असं त्यांनी सांगितलं.

तर पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. च्या संचालिका नेहा पंडित म्हणाल्या, “या गाड्या बनवतांना आम्ही प्रवाशांचा विचार केला आहे. गाड्यामध्ये प्रशस्त इंटिरियर, आरामदायी आसन व्यवस्था आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किमी लांबीचा मार्ग
पुणे मेट्रोचा हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग 23 किमी लांबीचा मार्ग आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर 23 स्थानके बांधली जात आहेत. पीएमआरडीएकडून पीपीपी तत्त्वावर या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. पुणेकरांना एप्रिल 2024 पासून मेट्रोचा तिसरा टप्पा मिळण्याची आशा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube