Download App

उद्धव ठाकरे उद्धट म्हणूनच त्यांनी… राजीनाम्याच्या मुद्द्यावर नारायण राणेंची जळजळीत टीका

Narayan Rane On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) उद्धट आहेत म्हणूनच त्यांनी त्यावेळी स्वत: राजीनामा दिला असल्याची जळजळीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी केली आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

नैतिकता जपण्यासाठी उद्धव ठाकरेंचा राजीनामा; ‘त्या’ निर्णयावर जितेंद्र आव्हाड म्हणाले…

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे शिवसेना-भाजपची युती करुन निवडणुकीत लढले. पण मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी नितीमत्ता आणि हिंदुत्वाला सोडचिठ्ठीदेत नैतिकतेचा बोझबारा उडवला आहे. त्यानंतर ते आज नैतिकेवर बोलत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा; भाजपचे 9 तर शिंदे गटाचे ‘इतके’ मंत्री घेणार शपथ

शिवसेनेतले चाळीस आमदार गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागणार होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना खाली उतरवून उद्धव ठाकरे यांना बसवणार असल्याचं विधाने केली जात होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदी बसवायला का गणपती आहे काय? तुम्ही राजीनामा दिल्यानंतर पुन्हा बसवण्याचा प्रश्नच येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

सत्ता संघर्षाच्या सुनावणीनंतर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘जास्तीत जास्त पक्षांनी….’

उद्धव ठाकरे यांना घटनेचं, संविधानाचं, काहीही ज्ञान नाही. ते अज्ञानी आहेत. सत्ताधाऱ्यांचे 16 अपात्र आमदार जाणार आणि आम्ही सत्तेत येणार अशा बातम्या सामना वृत्तपत्रामध्ये छापत आहेत. पण आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. देशात लोकशाही नांदत असून विरोधकांकडूनही फटाके वाजवण्यात येत आहेत.

Supreme Court Hearing on ShivSena : घटनापीठासमोर असलेले 9 प्रश्न; यावरच येणार निकाल?

तुम्ही सत्तेसाठी भाजपशी गद्दारी केली त्यानंतर आता तुम्हाला नैतिकतेवर बोलण्याचा संबंध येतोच कुठून? असा सवालही त्यांनी करत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्या. कृष्णा कुमारी, न्या. हेमा कोहली आणि न्या. पी.एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणावर निकाल दिला.

राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार वाचले आहे.

Tags

follow us