Download App

डॉ. दाभोलकर हत्येचा तपास बंद करण्यासाठी याचिका; SCची नोटीस…

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास बंद करण्याच्या याचिकेवर सुनावणी पार पडलीय. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालायने सीबीआयला नोटीस बजावली आहे. नोटीसीत म्हणणं मांडण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि अहसुंद्दिन अमनउल्लाह यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी पार पडलीय.

एक फोन, 1070 कोटींची खबर अन् पोलिसांचीही तंतरली… भर रस्त्यात काय घडलं?

मुक्ता आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली असून दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला असून तो बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश रद्दबातल करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

अजितदादांचा फोटो भाजपच्या बॅनरवर लावणाऱ्या ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी

ॲड. आनंद ग्रोव्हर आणि ॲड. किशन कुमार यांनी ॲड. अभय नेवगी यांच्यामार्फत याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. डॉ दाभोलकर खून खटल्यात संशयित आरोपींच्या विरोधात पुणे येथील न्यायालयात खटला सुरू आहे. दाखल याचिका पुणे येथील विशेष न्यायालयातील खटल्याच्या देखरेखीसाठी नसून हत्येचा सूत्रधार फरार असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं आहे.

सिद्धरामय्या मुख्यमंत्री : शिवकुमारांचं खच्चीकरण की काँग्रेसची राजकीय खेळी?

डॉ. दाभोलकर, कॉ गोविंद पानसरे, गौरी लंकेश आणि प्रा. कलबुर्गी यांचे खून हे एका व्यापक कटाचा भाग असल्याचे अनेक पुरावे याचिकेमार्फत मांडण्यात आले आहेत. या हत्यांमागील सूत्रधार फरार असेपर्यंत विवेकवादी विचारवंतांच्या जिवाला असलेला धोका कायम आहे, असे म्हणणे याचिकाकर्त्यांकडून मांडण्यात आले.

दरम्यान,मुक्ता आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने सीबीआयला तपास बंद करण्याच्या भूमिकेची पार्श्‍वभूमी स्पष्ट करण्याबाबत नोटीस बजावली आहे. यासंदर्भातील माहिती ॲड. नेवगी यांनी दिली.

Tags

follow us