अजितदादांचा फोटो भाजपच्या बॅनरवर लावणाऱ्या ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी
Jalgaon politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. पण स्वत: अजित पवार यांनी या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला होता. आता अजित पवार निकटवर्तीय मानले जाणारे आणि जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार (Sanjay Pawar) यांनी राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त एका दैनिकात दिलेल्या जाहिरातीच्या माध्यमातून अजित पवार आणि शरद पवार यांचा फोटो भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रसिद्ध केला होता. यामुळे त्यांनी पक्षा विरोधात कारवाई केली होती. या माध्यामातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी त्यांना बडतर्फे करण्याचे पत्र दिले आहे. यामुळे पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सुजय विखेंचे राम शिंदेंना प्रत्युत्तर; रोहित पवारांना पाठिंबा देण्यावर कोण विश्वास…
दरम्यान, एका बॅनरवर भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत अजित पवारांचा फोटो छापण्यात आला होता. त्यामुळे संजय पवार यांच्या भाजपसोबत वाढलेल्या जवळकीची चर्चा सुरु झाली होती. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती. तर अनेक वृत्तपत्राततही जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिलेल्या जाहिरातीची जोरदार चर्चा होती. संजय पवार यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये गिरीश महाजनांसोबत अजित पवारांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. एवढंत नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो छापण्यात आला होता.