Download App

मोठी बातमी : तब्बल 11 वर्षांनंतर दाभोलकर खून खटल्याचा फैसला; दोघांना जन्मठेप तर, तिघे निर्दोष

नरेंद्र दाभोळकर यांनी विवेकी विचारांनी सामाजिक कुप्रथा, धार्मिक अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्था यांच्या निर्मूलनासाठी आपले जीवन समर्पित केले होते.

  • Written By: Last Updated:

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर (Dabholkar murder) यांच्या हत्येप्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आज (दि.10) महत्त्वाचा निर्णय देत तीन आरोपींना निर्दोष, तर दोघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालायाने सचिन अंदूरे आणि शरद कळसकर यांना जनमठेप आणि पाच लाख दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर, विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर या तिघांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (Narendra Dabholkar Murder Case 2 Accused Convicted 3 Acquitted By Pune Session Court)

20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉक करत असताना ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांची दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडत हत्या केली होती. या हत्येनंतर, 15 सप्टेंबर 2021 रोजी पुण्यातील विशेष न्यायालयात हा खटला सुरु झाला होता.  त्यानंतर तब्बल 11 वर्षांनंतर या प्रकरणात न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं होतं. (Narendra Dabholkar Case Result) 

पाच आरोपींवर खटला दाखल

डॉ. दाभोलकर यांच्या हत्त्येप्रकरणी आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर 15 सप्टेंबर 2021 ला आरोप निश्चित करण्यात आले होते. न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या खटल्याची वर्षभर सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणातील विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.

20 ऑगस्ट 2013 रोजी नेमकं काय घडलं होतं? 

नरेंद्र दाभोलकर यांनी विवेकी विचारांनी सामाजिक कुप्रथा, धार्मिक अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्था यांच्या निर्मूलनासाठी आपले जीवन समर्पित केले होते. दाभोळकर यांनी कायम विवेकी विचारांनी समाजातील अंधश्रद्धा फोफावणाऱ्या घटनांवर भाष्य केलं. त्यामधून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. हे कार्य सुरू असतानाच त्यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉक करत असताना सकाळी 7 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडत हत्या करण्यात आली. सुरूवातीला घटनेचा तपास पुणे पोलिसांकडे होता. पुढे तो केंद्रीय अन्वेशन (सीबीआय) विभागाकडे सोपवण्या आला.

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला घटनाक्रम

■ 20 ऑगस्ट 2013 : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून
■ पुणे पोलिसांकडून चौकशीला सुरुवात
■ मे 2014 : पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे तपासाची सूत्रे

■जून 2016 : सीबीआयकडून दोन वर्षांनी पहिला आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडेला पनवेलमधून अटक.
■ सप्टेंबर 2016 : डॉ. वीरेंद्रसिंह तावडेवर हत्या आणि हत्येचं षडयंत्र रचल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल
■ ऑगस्ट 2018 : महाराष्ट्र एटीएसकडून वैभव राऊत आणि शरद कळसकर याला अटक.
■ मे 2019 : व्यवसायाने वकील असलेले संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला सीबीआयकडून अटक; पुनाळेकर आणि विक्रम भावेची न्यायालयाकडून जामिनावर मुक्तता.
■ सप्टेंबर 2019: दाभोलकर हत्याप्रकरणात आरोपी म्हणून दाखविलेल्या सनातन संस्थेशी संबंधित सारंग आकोलकर आणि विनय पवार यांची नावे दोषारोपपत्रातून वगळली.
■ सप्टेंबर 2021 : पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दार्भालकर हत्याप्रकरणी अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळस्कर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात दोषारोप निश्चित केले.
■ आठ वर्षांनी 2021 मध्ये सीबीआयने अटक केलेल्या आरोपीविरोधात खटला सुरू.

follow us