Narendra Patil On Manoj Jarange : गेल्या अनेक दिवसांपासून शांततेत आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अंतरवली येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपला बळी घ्यायचा आहे, अशी टीका त्यांनी केली. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil यांनीही जरांगेवर जोरदार टीका केली.
एक हजार कोटींच्या रस्त्याचे लोकार्पण मंत्री गडकरींच्या हस्ते; सुजय विखेंची माहिती
नरेंद्र पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांचा आता तोल सुटत चालला आहे. वारंवार फडणवीसांवर बोलून त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा आता जनतेच्या लक्षात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना सर्वात पहिल्यांदा आरक्षण दिले होते. सोबतच फडणवीसांनी मराठा समाजातील तरुणांना उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना केली. सारथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या. आणि त्यांच्याबद्दल इतकी खालच्या पातळीवर मनोज जरांगे बोलत आहेत. जरांगेचं हे आंदोलन वेगळ्या आणि राजकीय दिशेने जात असल्याची टीका नरेंद्र पाटील यांनी केली.
खोके सरकार बिल्डरांची हांजीहांजी करणं सोडून जनतेची सेवा कधी करणार?, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका
नरेंद्र पाटील पुढं म्हणाले की, मराठा बांधवांनो जरागेंची भूमिका मराठाद्वेषी आहे. मराठा आणि कुणबी यांच्यात ते अंतर निर्माण करत आहे. जरागेंनी आपला तोल सांभाळावा, असं पाटील म्हणाले.
जरांगेंचे आरोप काय?
पाच महिने झाले तरी फडणवीस यांनी आरोप मागे घेतले नाहीत. जर तुम्हाला बळी पाहिजे असेल तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. देवेंद्र फडणवीस मला मारण्याचा कट रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न आहदे. यामुळे मी सलाईन घेणंचं बंद केलं. नारायण राणे आणि अजय बारस्कर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.