Download App

सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्रिपदावरुन भांडण; शिवसेनेचा मविआवर निशाणा

Naresh Mhaske On Mahavikas Aghadi : शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी (Naresh Mhaske)महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi)जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ही महाविकास आघाडी नसून महाविरोधाभास आघाडी आहे. त्यांच्या कोणामध्येच एकमत नाही. आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)बोलत आहेत की, आमचा प्लॅन बी तयार आहे. ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री असे ते आज बोलले. सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे त्यानंतर काँग्रेसचे परंतु या ठिकाणी शिवसेनेची महत्त्वाची खुर्ची लावली जात आहे. काल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा मागे घेतलेला आहे. आता महाविकास आघाडीत फक्त अस्थिरता आहे.

जपून राहावं, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला

यावेळी म्हस्के म्हणाले की, या ठिकाणी सत्ता येण्याच्या आधीच मुख्यमंत्री कोण याच्यावरती आत्तापासून भांडत आहेत. बाजारात तुरी आणि यांच्यात मारामारी अशी पद्धत या ठिकाणी झालेली आहे. लंकेत सोन्याच्या विटा आहेत परंतु हे आत्ताच भांडत आहेत.

नाना पटोले म्हणत आहेत की, प्लॅन बी माझा तयार आहे, परंतु खऱ्या अर्थाने संजय राऊत यांचा प्लॅन सक्सेस झाला अशीही टीका त्यांनी केली आहे. संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व संपवायचं होतं. हे त्यांनी प्लॅन करून संपवलेला आहे.

अजित पवार यांचं खच्चीकरण करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे. केवळ कुठल्यातरी एका व्यक्तीला महाराष्ट्रातील राजकारणात स्थीर करायचं आहे. हे करण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचा प्लॅन करून खच्चीकरण केलेलं आहे.

या महाराष्ट्रात स्थीर सरकार फक्त भाजप आणि शिवसेनेचे युती सरकार देऊ शकतं. सभेमध्ये कोणी वाचन करायचं याच्यावरून ते भांडत आहेत.
उद्या एकमेकांचे कपडे देखील फाडतील अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. निवडणुकीला अजून वेळ आहे. पण त्याच्याआधीच कोणीतरी बोलते की माझा प्लॅन बी तयार आहे. कोण म्हणतंय मुख्यमंत्री होण्यासाठी आवडेल, या ठिकाणी कोणाचे तरी दुसऱ्यांचे बॅनर लागत आहेत. सगळीकडेच अनेक जणांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावत आहेत. उद्या संजय राऊत देखील बोलतील की, माझे देखील मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावा.

महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत फक्त तेच तेच मुद्दे पुन्हा-पुन्हा बोलले जात आहेत. मिंधे खोके, माझा बाप चोरलेला आहे, मर्द या व्यतिरिक्त कोणतेही मुद्दे नसतात. आता मुंबईमध्ये सभा आहे म्हणून त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर, खड्डे आणि रस्ते याच्याशिवाय कोणतेही विषय त्यामध्ये नसणार, अशी टीकाही शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी यावेळी केली आहे.

Tags

follow us