Naresh Mhaske On Manoj Jarange : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा नाव घेत भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले असल्याचा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच पुरावा म्हणून त्यांनी एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता या क्लिपवर शिंदे गटाकडून देखील प्रत्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी देखील प्रतिक्रिया देत मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच व्हायरल होत असलेल्या क्लिपमधील आवाज कुणाचे याबाबत देखील त्यांनी भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) म्हणाले की, व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी ती सायबर सेलकडे पाठवायला हवी. मनोज जरांगेंनी ती क्लिप पोलिसांना, सायबर सेलला द्यावी. जरांगे आणि शिवसेना यांच्यात भांडण लावण्याचं काम कोण करतंय ते समोर येईल. जरांगे यांनी विनाकारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करु नये असं नरेश म्हस्के म्हणाले.
तर ऑडिओ क्लिपमधील आवाज हे भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी (Shweta Shalini) , निधी कामदार (Nidhi Kamdar) आणि आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांचे असल्याचं दिसतंय. हे आवाज त्यांचेच आहेत का? ही ऑडिओ क्लिप खरी आहे का? हे समोर आलं पाहिजे आणि जर ही ऑडिओ क्लिप खरी असेल तर आमच्या नेत्यांबद्दल जर मित्र पक्षातील नेते अशी वक्तव्ये करत असतील तर वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी देखील खासदार म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना केली.
उच्च न्यायालयात एकनाथ घोगरेंची याचिका फेटाळली; सुजय विखेंचा जिल्हा बँकेतील मार्ग मोकळा!
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
पत्रकार परिषदेत जरांगे यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एक महिला सांगते की, जरांगे पाटील यांना ऑलरेडी 500 कोटी रुपये पोहोचले आहेत. श्रीकांत शिंदेमार्फत त्यांना पैसे पाठवण्यात आले आहे. आता जरांगे विधानसभेत आमच्या फायद्याचे राहतील की नाही राहणार याबाबतचं माझं मत वेगळं आहे. कॅलक्यूलेशन वेगळं आहे, बाकी तुम्ही जो विचार करत आहात असं या क्लिपमध्ये संभाषण होत आहे.
