Download App

राष्ट्रवादीला भोपळा! ना तटकरे, ना पटेल.. मंत्रिपदाच्या हुलकावणीने अजितदादा नाराज?

अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही यामुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

Modi Cabinet Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीत आज एनडीए सरकारचा शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांचा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर आणखी काही खासदार शपथ घेतील. यासाठी आज सकाळपासूनच भाजपसह एनडीएतील घटकपक्षांच्या खासदारांचे फोन खणखणत आहेत. खासदारांना मंत्रिपदासाठी विचारणा होत आहे. मात्र या सगळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नाव मागे पडलं आहे. कालपर्यंत प्रफुल पटेल यांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात होतं. परंतु, आज दिवस उगवल्यानंतर मात्र अजित पवारांच्या खासदारांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही अशी माहिती मिळत आहे. या घडामोडींमुळे अजित पवारही नाराज झाल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील नेते मंडळी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करत आहेत.

Pune News : पुण्याचे महापौर ते केंद्रीय मंत्री.. दोन वर्षात मोहोळांची गरुडझेप

यंदाच्या निवडणुकीत भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे. भाजपाच्या 63 जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे बहुमत दूरच राहिले फक्त 240 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एनडीए आघाडीचं बहुमत मात्र झालं आहे. आघाडीतील घटक पक्षांनी समर्थनाचं पत्रही देऊन टाकलं आहे. अशा पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

रविवारी मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर आणखीही काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील. यामध्ये महाराष्ट्रातील काही खासदारांची नावं समोर आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचं नाव निश्चित झालं होतं. दिल्लीत महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे उपस्थित होते.

परंतु, आज सकाळपासून मात्र चित्र बदललं आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल या दोघांपैकी एकालाही फोन आलेला नाही. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. या घडामोडींनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तटकरेंच्या दिल्लीतील घरी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेतेही येथे आले आहेत. बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत काय चर्चा होते. अजित पवार आणि त्यांच्या खासदारांची नाराजी मिटवण्यात भाजप यशस्वी होणार का असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

चंद्राबाबू नायडूंना चार, तर नितीशकुमारांना दोन मंत्रिपदे ! ‘ही’ खास व्यक्तीही मंत्रिमंडळात

follow us