Download App

“सहा जाती वगळून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करा; OBC नेत्याची मोठी मागणी

नागपूर : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातींना वगळून मराठा समाज मागास आहे का? याचा अभ्यास करावा. या सहा जाती आधीच ओबीसी समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करताना या जातींना वगळून सर्वेक्षण करावे, अशी मोठी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे केली. (National OBC Federation President Babanrao Taiwade met Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

आज (19 नोव्हेंबर) तायवाडे यांनी नागपूरमध्ये फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. तायवाडे म्हणाले, सप्टेंबरला सरकारसोबत जी बैठक झाली होती. त्यामध्ये सरकार आणि प्रशासनाकडून ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी काही आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज पावणे दोन महिने झाले, तरी काही मागण्यांसंदर्भात काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे त्याची आठवण करून देण्यासाठी आज उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Aditya Thackery यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

शिंदे समिती कुणबी जातीच्या नोंद शोधण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रभरात करत आहे. आमची मागणी आहे की, शिंदे समितीने ओबीसी समाजाच्या इतर जातींबद्दलही शोध घ्यावा. त्यामुळे या जातीतील अशा व्यक्तींना ज्यांची जातीची नोंद असूनही त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळत नसेल, त्यांना मदत होईल. असे झाल्यास शिंदे समितीच्या कामाचा लाभ इतर जातींना ही होईल, अशी मागणी यावेळी तायवाडे यांनी फडणवीसांकडे केली. हिवाळी अधिवेशनामध्ये आठ तारखेला मराठा समाजाच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे. याच हिवाळी अधिवेशनात एक दिवस ओबीसी समाजाच्याही विविध प्रलंबित मागण्या आणि प्रश्नांसाठी वेळ राखीव ठेवून चर्चा करावी, अशीही आमची मागणी आहे.

“मंत्री असून तुमचं ऐकलं जात नाही” : भुजबळांच्या ‘त्या’ आरोपाची रोहित पवारांकडून खिल्ली

नुकतेच सरकार ने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाच्या मागासलेपणाचे प्रकरण पुन्हा नव्याने देऊन मराठा समाज मागास सिद्ध होऊ शकतो का? या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण करावे अशी विनंती केली आहे. त्या संदर्भात आमची विनंती आहे की, मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करताना कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या सहा जातींना वगळून मराठा समाज मागास आहे का? याचा अभ्यास करावा. या सहा जाती आधीच ओबीसी समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मागासलेपणाचा अभ्यास करताना या जातींना वगळून सर्वेक्षण करावे, अशी आमची मागणी आहे, असेही तायवाडे म्हणाले.

Tags

follow us