“मंत्री असून तुमचं ऐकलं जात नाही” : भुजबळांच्या ‘त्या’ आरोपाची रोहित पवारांकडून खिल्ली

“मंत्री असून तुमचं ऐकलं जात नाही” : भुजबळांच्या ‘त्या’ आरोपाची रोहित पवारांकडून खिल्ली

Maratha Reservation : सध्या राज्यात आरक्षणाची (Maratha Reservation) लढाई दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. मराठा आरक्षणासाठी एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी कंबर कसली आहे. मात्र मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. त्यासाठी जालन्यातील अंबड येथे सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मेळावा घेतला. त्यावेळी ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे नेते जरांगे यांच्यासह रोहित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भुजबळांना टोला लगावला.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

भुजबळ यांच्या ओबीसी मेळाव्यातील वक्तव्यावर भाष्य करताना आमदार रोहित पवार म्हणाले, “छगन भुजबळ हे स्वत: मंत्री आहेत. मंत्री असताना त्यांना मंत्रीपदाचा योग्य वापर करता येत नसेल, या सरकारमध्ये मंत्र्यांचंच चालत नसेल, मंत्र्यांचंच ऐकलं जात नसेल, तर यावर आपण वेगळं काय बोलणार? अशा शब्दात रोहित पवार यांनी मंत्री भुजबळांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच पुढे ते म्हणाले की, राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा तर योग्य वेळ आल्यानंतर मी स्वत: यावर स्पष्टीकरण देईन,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भुजबळ नेमकं काय म्हणाले होते?

मराठा समुदायाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. नुकतेच मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी अंबड येथील आरक्षण बचाव एल्गार सभेतून थेट तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे व आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

ChatGPT: OpenAI मध्ये राजीनामा नाट्य, मीरा मुराती यांची सीईओपदी निवड

भुजबळ म्हणाले, लाठीमार झाल्यानंतर जरांगे घरात जाऊन झोपले होते. त्यांना आमचे अंबडचे मित्र राजेश टोपे आणि दुसरे आमचे मित्र रोहित पवार यांनी रात्री घरातून उठवून आणलं आणि आंदोलन करण्यासाठी बसवलं. शरद पवार आंदोलनस्थळी येणार आहेत, असं त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर शरद पवारांनाही तिथे आणलं,” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

मराठा अन् धनगर आरक्षणाची चर्चा थेट राष्ट्रपती भवनात! ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतली मु्र्मूंची भेट

दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आमदार पवार यांनी या यात्रेची सुरुवात आपल्या मतदार संघात म्हणजेच चौंडी येथून सुरुवात केली. दरम्यान सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान पेटले आहे. यातच आता नेतेमंडळी देखील एकमेकांवर टीका टिपण्णी करू लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube