Download App

सचिन तेंडुलकरांना जाहिरात करायची तर भारतरत्न परत करा; बच्चू कडू आक्रमक

Bacchu Kadu On Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)यांनी ऑनलाईन गेमिंगच्या (Online gaming)जाहिराती करणं बंद करावं, अन्यथा भारतरत्न माघारी देऊन जाहिराती कराव्या अशी आक्रमक भूमिका माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी केली आहे. सचिन तेंडुलकरांनी कोणतीतरी एक भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करु, असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

जळगावच्या प्रसिद्ध व्यासायिकांवर पुण्यात गुन्हा दाखल: कोट्यावधींची फसवणूक केल्याचा आरोप

ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीवरुन प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मुंबईमध्ये आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सचिन तेंडुलकर हे भारतरत्न आहेत. भारतरत्न असलेल्या व्यक्तीचा आदर्श तरुण पिढीसमोर असतो. अशा व्यक्तीने चुकीचे कृत्य केल्यास त्याचा वाईट परिणाम तरुण पिढीवर होतो.

Jawan मधील ‘नॉट रमैया वस्तावैया’ गाणं आलं चाहत्यांच्या भेटीला; किंग खान अन् नयनतारा यांचा हटके डान्स

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)यांनी ऑनलाईन गेमची जाहिरात केली. त्यांनी जुगाराचं समर्थन केलं आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीवर आमचा आक्षेप आहे. असं असलं तरी सचिन तेंडुलकर यांच्याकडून त्यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

बच्चू कडू म्हणाले की, या गेमिंगमुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. सचिन तेंडुलकर यांच्याविषयी आमच्या मनात आदर आहे. असं असलं तरी त्यांना 300 कोटी घेऊन जाहिरात करायची आहे तर भारतरत्न परत द्यावा. त्यांनी काही तरी एक निवडावे, असे आवाहनही आमदार कडू यांनी केले.

सचिन तेंडुलकर यांनी यावर ठोस भूमिका न घेतली नाही तर प्रहार संघटना त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहे. म्ही उद्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार असल्याचेही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

Tags

follow us