Download App

‘मला घरातून फरफटत नेलं अन् 14 दिवस..,’ नवनीत राणांच्या विधानाने लक्ष वेधलं

Navneet Rana : हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा करताच मला घरातून फरफटत नेऊन 14 दिवस तुरुंगात आणि 2 दिवस पोलिस कोठडीत ठेवल्याचं सांगत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांच्या अविश्वास ठरावावर चर्चेदरम्यान नवनीत राणा सभागृहात बोलत होत्या.

अनिल गोटेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा, शरद पवारांची साथ सोडणार?

नवनीत राणा म्हणाल्या, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आत्ता लोकसभेत हनुमान चालीसा पठण केलं. ते करत असताना मला भीती वाटली नाही. कारण देशात मोदी सरकार आहे. परंतु, आमच्या महाराष्ट्रात मी फक्त घोषणा केली होती की, मी हनुमान चालीसा पठण करेन. त्यानंतर मला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं. मला १४ दिवस तुरुंगात आणि दोन दिवस कोठडीत ठेवलं. परंतु, इथे नरेंद्र मोदी यांचं राज्य आहे. या लोकसभेत असा अत्याचार कोणी कोणावर करणार नसल्याचं राणा यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

मुंबईत होणाऱ्या ‘इंडिया’च्या बैठकीची अशोक चव्हाणांवर मोठी जबाबदारी

तसेच महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या महिला त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर आंदोलन करत होत्या. तेव्हा राज्य सरकारने आंदोलक महिलांना उचलून तुरुंगात डांबलं होतं. एक महिना तुरुंगातच ठेवलं. तेव्हा हा विरोधी पक्ष का गप्प बसला होता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

अमेरिकन खासदार 15 ऑगस्टला पाहुणे: आजोबा होते स्वातंत्र्यसैनिक, गांधीजींसोबत तुरुंगातही गेले

आम्ही महिला, आई, नंतर खासदार आहोत. अधिवेशनात सकाळापासून विरोधकांकडून पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्यासाठी हा प्रस्ताव आणण्यात आला आहे. महिलांविषयी सहानूभूतीचा एकही शब्द विरोधकांकडून ऐकण्यात आला नाही. मणिपूर महिला अत्याचाराची घटना निषेधच आहे.

दरम्यान, 4 मेच्या घटनेला जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनात विचारलं जातं आहे, एक दिवस आधी पत्रकारंकडून बातमी दाखवली जात आहे. ज्यांनी हे व्हिडिओ व्हायरल केले सभागृहात हे प्रकरण आणण्याचं काम विरोधी पक्षाने केलंय त्यावर चौकशी व्हायला हवी, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.

Tags

follow us