मुंबई : भारतातील राजकारण्यांची संपत्ती हा कायमच चर्चेचा आणि भुवया उंंचावणारा विषय असतो. आताही महाराष्ट्रात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय सहाही उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे चर्चेचा विषय ठरला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते तब्बल 483 कोटींचे मालक आहेत. इतरही उमेदवारांची संपत्तीही कोट्यावधीच्या घरात आहे. (NCP candidate Praful Patel has emerged as the richest candidate with a net worth of Rs 483 crore)
राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून (BJP) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि पक्षाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेनेकडून माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी देण्यात आली.
या सर्वांनी काल (15 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आपले अर्ज दाखल केले. सध्या सहा जागांसाठी सात अर्ज आले आहेत. मात्र सातवा अर्ज अपक्ष असून तो छाननीत बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यानंतर या अर्जांमध्ये उमेदवारांनी उल्लेख केलेले संपत्तीचे आकडे समोर आले आहेत.
प्रफुल पटेल हे श्रीमंत उमेदवार असून मालमत्ता 483 कोटी आहे.
अशोक चव्हाण यांची मालमत्ता 16 कोटी असून स्थावर मालमत्ता 51 कोटी 65 लाख इतकी आहे.
मेधा कुलकर्णी यांच्याकडे 2 कोटी 48 लाखांची स्थावर संपत्ती असून त्यांची जंगम मालमत्ता 2 कोटी 43 लाख रूपयांची आहे.
डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे 1 कोटी 88 लाख मुल्याची स्थावर मालमत्ता असून 3 कोटी 41 लाख रूपयांची जंगम संपत्ती आहे.
मिलिंद देवरा यांच्याकडे 23 कोटी रूपयांची मालमत्ता असून ते व त्यांच्या पत्नीकडे 114 कोटी इतक्या मुल्याची जंगम मालमत्ता आहे.
चंद्रकांत हंडोरे यांची मालमत्ता 1 कोटी 68 लाख रूपये आहे.