Download App

शरद पवारांना मोदींच्या मंत्रिमंडळातील ‘हा’ नेता आवडतो

Sharad Pawar On PM Modi Cabinet :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील त्यांना आवडणाऱ्या नेत्याविषयी भाष्य केले आहे. शरद पवार यांनी कायम मोदी सरकारवर वेगवेगळ्या विषयांवरुन टीका केली आहे. नुकतीच त्यांनी संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरुन मोदी सरकारला सुनावले होते. तसेच  त्यांनी बोलताना उत्तर प्रदेश, आसाम व गुजरात एवढ्याच राज्यात भाजपला पाठिंबा असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर शरद पवारांना मोदींच्या मंत्रिमंडळातील आवडता मंत्री कोण असं विचारण्यात आले. तेव्हा नितीन गडकरी यांचे नाव घेतले. यावेळी ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार म्हणाले की, काही लोकांचा काम चांगलं आहे. उदाहरणार्थ नितीन गडकरी. मी पाहतो की त्यांना विकासाच्या कामात रस आहे. शेवटी शासना तुमच्या हातात आल्यावर काही तरी ‘रिझल्ट’ दिला पाहिजे. त्यात नितीन गडकरी पुढे आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाहीत, असे ते म्हणाले.

Sharad Pawar : राज्य सरकारच लोकांना उचकवू लागले; संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा गंभीर आरोप

तसेच आपण नितीन गडकरींना एखादा प्रश्न सांगितला, तर तो प्रश्न कोण सांगतोय यापेक्षा तो प्रश्न किती महत्त्वाचा आहे याकडे ते लक्ष देतात. ही एक समंजसपणाची गोष्ट आहे. मात्र, असा अनुभव केवळ त्यांच्याबद्दलचाच आहे, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर दंगलीवरुन विरोधकांनी फडणवीसांना घेरले, थेट राजीनाम्याची मागणी

दरम्यान, यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीवरही भाष्य केले. पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांत दंगलीसारख्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटना त्या त्या भागांपुरत्याच मर्यादित राहिल्या. ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून केले जात आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, औरंगाबादमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला, तर मग पुण्यात आंदोलन करण्याची काय गरज आहे? पुण्यात याबद्दल कोणाला पडले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांवरून आणखी किती तणाव निर्माण होतो, हे पाहिले जात आहे.

Tags

follow us