Sharad Pawar : राज्य सरकारच लोकांना उचकवू लागले; संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा गंभीर आरोप

Sharad Pawar : राज्य सरकारच लोकांना उचकवू लागले; संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा गंभीर आरोप

Sharad Pawar On Riot : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी दंगली (riot) उसळल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, शेवगाव येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या. राज्यात धार्मिक-जातीय तणावाच्या घटना वारंवार घडत आहेत. कालच एक घटना संगमनेरमध्ये (Sangamner) तर दुसरी घटना कोल्हापुरात घडली. या घटना जाणूनबुजून केल्या जात आहेत. राज्य सरकार अशा घटनांना प्रोत्साहन देत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केला. (Sharad Pawar makes serious accusations against the Shinde-Fadnavis government over the riot-like incidents of Sangamner, Kolhapur)

शरद पवार यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी संगमनेरमधील दगडफेकीच्या दोन घटना आणि कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोवरून निर्माण झालेला तणाव यावर परखड शब्दात भाष्य केले. पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांत दंगलीसारख्या घटना घडल्या आहेत. मात्र, या घटना त्या त्या भागांपुरत्याच मर्यादित राहिल्या. ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून केले जात आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, औरंगाबादमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला, तर मग पुण्यात आंदोलन करण्याची काय गरज आहे? पुण्यात याबद्दल कोणाला पडले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांवरून आणखी किती तणाव निर्माण होतो, हे पाहिले जात आहे.

शरद पवार म्हणाले, राज्यात काल पुन्हा राज्यातील संगमनेर आणि कोल्हापुरात सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरून लगेच रस्त्यावर उतरुन घटनेला लगेच धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही. सत्तेत असलेल्यांनी अशा गोष्टींना प्रोत्साहन देणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण, जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करून राजकारण लागले तर ही चांगली गोष्ट नाही, असं पवारांनी सांगिलतं.

ठाकरेंच्या पॉडकास्टची फडणवीसांकडून खिल्ली; म्हणाले, त्यांचं फक्त फेसबुक लाईव्ह…

पवार म्हणाले, ओडिशा आणि काही राज्यांमध्ये चर्चवर हल्ले होत आहेत. ख्रिश्चन समाज शांतताप्रिय आहे. जर कोणाची चूक असेल तर सरकारने पोलिसांवर कारवाई करावी. मात्र तसे न केल्याने चर्चवर हल्ले होत आहेत. ते कोणा एका व्यक्तीचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे, ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही, असं पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube