मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

Sharad Pawar Death Threat :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या मुंबई पोलिसांच्या भेटीला आल्या आहेत. शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी सुळेंनी केली. 2 ट्विटर हॅंडेलवरुन हे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळेंनी केली असल्याचे समजते. यावर खासदार सुप्रिया सुळे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 02T162920.794

Sharad Pawar

Sharad Pawar Death Threat :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या मुंबई पोलिसांच्या भेटीला आल्या आहेत. शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी सुळेंनी केली. 2 ट्विटर हॅंडेलवरुन हे ट्विट करण्यात आले आहे. या ट्विट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुळेंनी केली असल्याचे समजते.

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला व्हॉट्सअॅपवरुन हा एक मेसेज आला. कोणत्या तरी एक वेबासाईटवरुन धमकी देण्यात येत आहे. त्याचे फॉलोअर्स जे आहे ते देखील वाईट पद्धतीच्या कमेंट यावर करत आहे, असे त्या म्हणाल्या. तुमचाही दाभोलकर होणार, असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.

जर काही झालं तर त्याला फक्त देशाचं व राज्याचं गृहखातं जबाबदार असेल असे सुळे म्हणाल्या. काही बरंवाईट झालं तर केंद्रीय गृहखातं जबाबदार असेल, असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना इशारा दिला आहे. राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. महिला व मुलींच्याबाबतीत अधिकच धोकादायक स्थिती झाली आहे. त्यामुळे अमित शाहांना माझी विनंती आहे की, त्यांनी तात्काळ राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घ्यावा, अशी मी विनंती करते.

तसेच सोलापूर येथे एक मुलगा आपल्या महिला प्राध्यपिकेबरोबर व एका मैत्रीणीबरोबर कॉफी पित होता. त्यावेळी अचानक काही लोक आले व त्या मुलाला मारहाण केली.  महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरु आहे, असे त्या म्हणाल्या.

दरम्यान, यापूर्वीही पवार यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. गेल्यावेळी डिसेंबर 2022 मध्ये पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली होती. मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिली होती. मात्र तपासाअंती ही धमकी एका माथेफिरुने दिली असल्याचे समोर आले होते.

 

 

Exit mobile version