Download App

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का? शरद पवारांचं थेट उत्तर, म्हणाले..

माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. राज्यात काय चर्चा सुरू आहे याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे.

Sharad Pawar on Dhananjay Munde : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या (Santosh Deshmukh Case) हत्या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवरही या प्रकरणात आरोप होत आहेत. तसेच वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.

शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे असे विचारले असता शरद पवारांनी मत व्यक्त केला. शरद पवार म्हणाले, संपूर्ण प्रकरणच चिंताजनक आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या केली. त्यामागे कोण लोक आहेत याची चर्चा सर्वत्र होत आहे. मस्साजोग येथे आणि नंतर परभणी येथेही मीच पहिल्यांदा भेटायला गेलो होतो. लोकांमध्ये चीड आहे. या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकतो असं दिसत आहे.

Santosh Deshmukh Murder : तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुडेंविषयी निर्णय घेऊ; बावनकुळेंचं वक्तव्य

या गोष्टीमुळे मी यातून मार्ग काढण्याची बाब मी मुख्यमंत्र्‍यांच्या कानावर घातली. या ठिकाणी राजकारण होऊ नये. समाजात एकवाक्यता राहावी अशी भूमिका मांडली होती. पण दुर्दैवाने काही ना काही घडतंय हे महाराष्ट्राला निश्चितच शोभणारं नाही अशी खंत शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे का या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, माझ्या भूमिकेपेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. राज्यात काय चर्चा सुरू आहे याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. माझ्यापेक्षा या प्रकरणाची जास्त माहिती गृहखात्याकडे असावी. आता वस्तुस्थिती पाहूव वातावरण कसं निवळेल यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अशा सूचक शब्दांत शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

“अमित शाहांची टीका जिव्हारी लागली नाही कारण..” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!

follow us