“अमित शाहांची टीका जिव्हारी लागली नाही कारण..” शरद पवारांकडूनही हिशोब क्लिअर!

Amit Shah And Sharad Pawar

Sharad Pawar on Amit Shah : शिर्डीतील भाजपच्या (BJP) राज्यस्तरीय अधिवेशनात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. १९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं, अशी टीका शाह यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवर आज शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत आहे.

अमित शाहांनी बीड, परभणीवर बोलायला हवं होतं, पण ते हेडलाईनसाठी पवारांवर..सुळेंची खोचक टीका

काय म्हणाले होते अमित शाह ?

शिर्डीतील अधिवेशनात बोलतांना शाह म्हणाले, शरद पवार यांनी १९७८ पासून दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं. त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम कार्यकर्त्यांनी केलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला. २०१९ ला विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिध्दांताला सोडलं होतं. दगाफटका करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, मात्र, नंतर तुम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका शाह यांनी केली.

शरद पवार काय म्हणाले?

गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता पवार म्हणाले, अनेक चांगले प्रशासक आणि गृहमंत्री देशाने पाहिले आहेत. आधीच्या राजकीय नेत्यांमध्ये सुसंवाद होता आता तसं दिसत नाही. जनसंघाच्या लोकांनी आमच्यासोबत काम केलं होत. परंतु, आता शिर्डीतील अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद आहेत.

शरद पवारांचं राजकारण 20 फूट जमिनीमध्ये गाडलं.. अमित शाह यांची बोचरी टीका

देशात अनेक गृहमंत्री झाले पण कुणालाही तडीपार केलेलं नव्हतं. अमित शाह यांनी माझ्यावर केलेली टीका मला जिव्हारी लागली नाही कारण अमित शाह काही नोंद घेण्यासारखी व्यक्ती नाही. अमित शाह यांनी गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा त्यांनी बाळासाहेबांचा आसरा घेतला अशा शब्दांत शरद पवार यांनी अमित शाहांना प्रत्युत्तर दिलं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube