Download App

अजित पवारांनी मौन सोडलं; भाजप प्रवेशाची फक्त चर्चा, यात काही तथ्य नाही

Ajit Pawar On Join BJP Issue :  गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा केल्या जात आहेत.

यानंतर अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्त वाहिनीला माहिती दिली आहे. नव्या राजकीय समीकरणांची फक्त चर्चा आहे. त्यात काही तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले आहे. पण राष्ट्रवादीचे काही आमदार हे मुंबईला अजित पवारांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी साडे अकरापर्यंत थांबा आणि काय होतयं ते पहा असे विधान केले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चांनी जोर धरला आहे.

Ajit Pawar : कुठलाही भूकंप सांगून येत नाही, बंडावर अशोक चव्हाणांचं सूचक वक्तव्य

दरम्यान, यावर आता कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील सूचक वक्तव्य केले आहे. चव्हाण म्हणाले की, कुठलाही भूकंप सांगून येत नाही. महाराष्ट्रातील संत महात्म्यांची पुण्याई भरपूर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात असा राजकीय भूकंप येण्याची सुतराम शक्यता नाही. असं देखील ते पुढे म्हणाले आहेत. त्यामुळे चव्हाणांच्या या सूचक वक्तव्याने चर्चांना उधान आले आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…मी काय अजित पवार यांचा प्रवक्ता नाही

तसेच अजित पवार यांच्याप्रमाणे अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सूरू झाल्या होत्या. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रे दरम्यान या चर्चांना उधान आले होते. कारण यावेळी चव्हाणंची नाराजी दिसून आली होती. तर काही ठिकाणी त्यांनी याच नाराजीमुळे ते गैरहजर राहिल्याचे बोलले जात होते.

Tags

follow us